वाघुंडे बुद्रुक येथे सरपंचपदी संदीप वाघमारे यांची बिनविरोध निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 16, 2021

वाघुंडे बुद्रुक येथे सरपंचपदी संदीप वाघमारे यांची बिनविरोध निवड

 वाघुंडे बुद्रुक येथे सरपंचपदी संदीप वाघमारे यांची बिनविरोध निवड


नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः पारनेर तालुक्यातील वाघुंडे बुद्रुक येथे झालेल्या सरपंच पदाच्या निवडीमध्ये संदीप गौतम वाघमारे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही एन उघडे यांनी काम पाहिले.
   वाघुंडे बुद्रुक येथील सरपंच पद हे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव होते मात्र या प्रवर्गातून महिला सदस्य निवडून न आल्याने गेल्या महिन्यात झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत येथील जागा रिक्त राहिली होती त्या जागेबाबत जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार ज्योती देवरे यांच्या उपस्थितीत पारनेर तहसील कार्यालयामध्ये पुन्हा आरक्षण सोडत काढण्यात आली यामध्ये अनुसूचित जाती साठी सोडत निघाली अनुसूचित जाती या प्रवर्गातून संदीप गौतम वाघमारे हे सदस्यपदी निवडून आले होते त्यामुळे त्यांचा सरपंच पदाचा मार्ग मोकळा झाला होता त्यानुसार दि.15 रोजी पार पडलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये संदीप वाघमारे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषित केली त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून संतोष गाडीलकर यांची सही होती यावेळी उपसरपंच लताबाई अनिल रासकर छायाताई अनिल गाडीलकर  सुनीता शरद रासकर चैत्राली रविश रासकर संतोष गाडीलकर दत्ता शिवाजी दिवटे आदी उपस्थित होते.
   सरपंचपदी निवड झाल्या नंतर आमदार निलेश लंके यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या यावेळी संजय वाघमारे मधुकर वाघमारे पोपट वाघमारे रामदास गायकवाड भिमराव वाघमारे  तसेच माजी सरपंच राजेंद्र रासकर संदिप मगर शिवाजी दिवटे  चेरमन सुदाम दिवटे राजेंद्र रासकर युवा नेते गणेश रासकर बाळासाहेब पांडुरंग गाडीलकर  साई एशियनचे संचालक किरण रासकर विक्रम गाडीलकर   यांनी  शुभेच्छा यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here