मनसेच्या आंदोलनापुढे महावितरण नरमले ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 2, 2021

मनसेच्या आंदोलनापुढे महावितरण नरमले !

 मनसेच्या आंदोलनापुढे महावितरण नरमले !

विद्युत पुरवठा खंडित न करता विजबील वसूल करणार...

नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः पारनेर तालुक्यातील सर्व शेतीपंपाचा विजपुरवठा बंद केल्याने महावितरणच्या आडमुठ्या धोरणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष डी एन साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्या अगोदर महावितरणचे अभियंता अडभाई यांनी विद्युत पुरवठा खंडित न करता विजबील वसूल केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. महावितरण कडून कोणतीही पूर्वसूचना न देता शेतीपंपाचा विद्युत पुरवठा खंडित केला जातो तसेच सात वर्षांच्या काळात एकाही शेतकर्‍याला विजबिल न देता शेतीपंपाचा विद्युत पुरवठा खंडित केला
   यामुळे शेतातील उभ्या पिकाने माना टाकल्या.  शेतकर्‍यावर होणार्‍या अन्यायाविरोधात आज सोमवार दि.1 रोजी सकाळी 11:00 वाजता नगर पुणे महामार्गावरील सुपा चौकात आंदोलन करण्यात आले.
महावितरणा कडुन होणार्‍या बंद वीजपुरवठ्यामुळे शेतकरी बांधवांचे होणारे शेतमालाचे नुसकान कांदा, गहु, हरबरा, कलिंगड, काकडी व  जनावरांचा चारा अक्षरशःहा सुकून गेला आहे शेतकरी बांधवांची पिळवणूक केली जात असल्याचे सांगत डि एन साबळे यांनी अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले.
   यावेळी अभियंता अडभाई यांनी सांगितले आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या मताशी सहमत आहोत परंतु महावितरण शेतकर्‍यांसाठी विजबीलाबाबत सवलत देणार आहे.यात शेतकर्‍यांनी भरलेल्या विजबीलातून ग्रामपंचायतला 33% रक्कम मिळणार आहे.या रक्कमेतून गावपातळीवर विद्युत तारा,पोल,यासह ट्रांसफार्मरची दुरुस्ती करता येणार आहे. यावर साबळे म्हणाले की, तुमचे  म्हणणे बरोबर आहे परंतु विद्युत पुरवठा बंद केल्याने शेतात उभे असलेले पीक जळू लागली आहेत.गेल्या एक वर्षापासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शेतातील पिकांना बाजारभाव मिळत नाही.आता कुठे तरी थोडे फार पाणी शिल्लक आहे तर तुम्ही विद्युत पुरवठा बंद केला.मग शेतकर्‍यांनी न्याय मागायचा कुणाला असे सांगून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी जिल्हा अध्यक्ष नितीन म्हस्के, तालुका अध्यक्ष बाळासाहेब माळी, उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना खडे बोल सुनावले.
   अभियंता अडभाई, श्रेयश रूद्राकर यांनी शेतकर्‍यांचा विद्युत पुरवठा खंडित न करता विजबील वसूली केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर नियोजित असलेला रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे, उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
   यावेळी सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष डी एन साहेब,  जिल्हाध्यक्ष नितीन म्हस्के, पारनेर तालुका अध्यक्ष बाळासाहेब माळी, तालुका उपाध्यक्ष सतीश म्हस्के,अविनाश पवार, मारुती रोहकले, महेंद्र घाडगे, वशिम राजे, अतुल वरखडे, अक्षय सुर्यवंशी, संदीप चव्हाण, दत्ताशेठ पवार, मुरलीधर पवार, सुरेश नेटके, पांडुरंग पवार, दिगंबर पवार, दिलीप जाधव, अक्षय सुर्यवंशी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here