इच्छा फाऊंडेशनतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 9, 2021

इच्छा फाऊंडेशनतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

इच्छा फाऊंडेशनतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः सौ. मनीषा देवळालीकर अध्यक्ष असलेल्या ईच्छा फाऊंडेशनने जागतिक महिला दिन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटात आणि वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा केला. कोरोना या आजाराच्या पार्श्र्वभूमीवर तोंडाला मास्क लावून आणि सोशल डिस्टन्ससिंगचे पालन करून सर्व महिलांनी एकत्रितपणे कार्यक्रमाची शोभा वाढवली .या वेळी सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि या थोर नारी शक्तीला सर्व महिलांनी अभिवादन केले.या वेळी अध्यक्षीय भाषणात सौ. देवळालीकर या म्हणाल्या की,फक्त जागतिक महिला दिनी च नाही तर आपले संपूर्ण आयुष्य  हे समाजासाठी आणि मुलींच्या शिक्षणासाठी झटणार्‍या सावित्रीबाई फुले आणि   अहिल्यादेवी होळकर यांना  मानाचा मुजरा, कारण यापुढे या महान महिला आणि त्यांच्या या कार्याचा आदर्श आपण सर्वांनी घ्यावा आणि यामध्ये महिलांनीच पुढाकार घ्यायला हवा.
   यावेळी या कार्यक्रमाला विशाल देवळालीकर,तृप्ती शेवंते, सविता कुलथे,शोभाताई देवळालीकर ,अनुराधा देवळालीकर ,ज्ञानेश सिन्नरकर,  आगरकर, गणेश कुलथे,अंजना डहाळे आदींसह  अनेक  महिला तसेच पुरुषानीही उपस्थिती लावली.तसेच यावेळी चिमुकल्या कु. माही आणि भैरवी विशाल देवळालीकर यांनी गीत आणि नृत्य सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले.सौ मनीषा देवळालीकर यांनी यावेळी उपस्थित महिलांना पुस्तके तसेच गुलाबाचे फूल भेट म्हणून दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here