शेतकर्‍यांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला नेवाशात उत्स्फूर्त प्रतिसाद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 27, 2021

शेतकर्‍यांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला नेवाशात उत्स्फूर्त प्रतिसाद

 शेतकर्‍यांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला नेवाशात उत्स्फूर्त प्रतिसाद

काँग्रेसच्या जाहीर पाठिंबा शेतकर्‍यांसह तहसील कार्यालयावर मोर्चा
   जोपर्यंत केंद्र सरकार अन्यायी कायदे मागे घेत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष शेतकर्‍यांच्या पाठिशी ठाम उभा राहिल व  अविरत लढा देईल, नेवासा तालुक्यात पक्ष भेद बाजूला ठेवून सर्वांनी शेतकरी बांधवांच्या पाठिशी उभे राहून शेतकर्‍यांना साथ दयावी. - संभाजी माळवदे  अध्यक्ष काँग्रेस कमिटी नेवासा

नगरी दवंडी/प्रतिनिधी

नेवासा ः केंद्र सरकारने आणलेले अन्यायकारक कृषी कायदे मागे घेण्यात यावे यासाठी देशभरात शेतकरी संघटना कडुन आज देशव्यापी बंद पुकारण्यात आला होता या देशव्यापी बंदला काँग्रेस पक्षाने जाहीर पाठिंबा देऊन सहभागी नोंदवला.
   नेवासा तालुक्यात आज उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला या बंदला नेवासा काँग्रेस पक्षाने जाहीर पाठिंबा दिला तसेच विविध शेतकरी संघटना व शेतकरी बांधवांसह पंचायत समिती पासून तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.यावेळीं केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली व जाहीर निषेध करण्यात आला.
   यावेळी नेवासा काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे यांनी केंद्र सरकारने आणलेले  अन्यायी कृषि कायदे तातडीने मागे घ्यावेत, इंधन दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी करून, काँग्रेस पक्ष हा नेहमीच शेतकरी बांधवांच्या पाठिशी उभा राहिला आहे, जर कायदे मागे घेतले नाही आक्रमक भूमिका काँग्रेस पक्ष घेईल असा इशारा त्यांनी दिला.
   अखिल भारतीय किसान संघर्ष समितीचे बन्सी सातपुते यांनी केंद्राने आणलेले कृषि कायदे शेतकरी बांधवांसाठी किती हानिकारक आहेत, त्याचे भविष्यात शेतकर्‍यांवर होणारे दुष्परिणाम व शेतीचे भांडवली करण मोदी सरकार करत असल्याचा आरोप केला.
कॉम्रेड बाबा अरगडे यांनी यापुढे हा लढा अधिक तीव्र करून शेतकर्‍यांनी पूर्ण ताकदीने या लढाईत समावेश होण्याचे आवाहन शेतकरी बांधवाना केले.
   यावेळीं काँग्रेसचे जिल्हा सेक्रेटरी सुदमराव कदम,तालुका प्रसिद्धी प्रमुख सचिन बोर्डे ,  सरचिटणीस प्रवीण तिरोडकर, संदीप  मोटे, कार्याध्यक्ष कमलेश गायकवाड, सतिष तर्‍हाळ, युवक काँग्रेसचे आकाश धनवटे, सौरभ कासावणे, तन्वीर शेख, नंदकुमार कांबळे, रमेश जाधव, आदींसह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी बांधव उपस्थित होते, यावेळीं नेवासा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा याना कृषी कायदे मागे घेण्यात यावे आशा आशयाचे निवेदन देण्यात आले.

No comments:

Post a Comment