अबब! नेवाशात नागरिकांची चाललीय मज्जाच मज्जा, कोरोना नियमांचा उडवला जातोय पुरता फज्जा ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 20, 2021

अबब! नेवाशात नागरिकांची चाललीय मज्जाच मज्जा, कोरोना नियमांचा उडवला जातोय पुरता फज्जा !

 अबब! नेवाशात नागरिकांची चाललीय मज्जाच मज्जा, कोरोना नियमांचा उडवला जातोय पुरता फज्जा !


नगरी दवंडी/प्रतिनिधी

नेवासा ः देशात कोरोना या संसर्गजन्य प्रादुर्भावाची दुसर्‍या लाटीचा फैलाव वाढू नये म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून देशातील सर्वच राज्याच्या मुख्यमंञ्यांशी संपर्क साधून आढावा घेत उपाययोजना आखण्याचे आदेश दिलेले असतांना राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात आणलेल्या असतांना नेवासा तालूक्यात कोरोना या संसर्गजन्य आजाराचा पुरता फज्जा उडाला असल्याचे चिञ दिसून येत असून महसूल व पोलिस प्रशासन कोरोनाच्या प्रार्श्वभूमीवर गर्दी टाळत नसल्याने चौका - चौकात मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतही नेवासकर पुन्हा अडकू लागलेले असतांना प्रशासन माञ गाफील असल्याचे दिसून येवू लागले आहे. अनेक शाळांमधील शिक्षकही कोरोणा बाधित झाले असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा केविलवाणा प्रयत्न अनेक संस्थांकडून चालवला जात   असल्याचे चित्र सध्या तालुक्यात पहायला मिळत आहे .भविष्यात  विद्यार्थ्यांमधे कोरोनाचा संसर्ग पसरला तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता पालक विचारत आहेत.  सगळीकडे निर्बंध लावले जात असताना एस.टी महामंडळ मात्र गुराढोरांसारखे प्रवासी भरून ने आण करताना दिसतात.अशा चालक आणि वाहकांवर मात्र कारवाई होताना आढळून आली नाही.
   पोलिसांकडून केवळ मास्क न लावलेल्या दुचाकीस्वरांवर कारवाई केली जात असून चौकात होणार्‍या गर्दीकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. नगर जिल्ह्यात माजी मंञी अनिलभैय्या राठोड,माजी खासदार दिलीप गांधी यांचे कोरोना या संसर्गजन्य आजाराने निधन झालेले असताना दुसर्‍या लाटेत नेवासा तालूक्यातील रुग्ण संख्या भर घालतांना दिसून येत आहे. महसूल व पोलिस यंञना सार्वजनिक गर्दीवर अंकूश ठेवत नसल्याने सर्वसमान्य जनतेतून भिती व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here