जोश आणि होश यांचे तारतम्य बाळगावे लागेल ः उद्धव ठाकरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 30, 2021

जोश आणि होश यांचे तारतम्य बाळगावे लागेल ः उद्धव ठाकरे

 जोश आणि होश यांचे तारतम्य बाळगावे लागेल ः उद्धव ठाकरे


नाशिक ः
सेवा करताना पोलिसांना अनेक भूमिका बजावाव्या लागतात. चित्रपटात दाखवतात आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. प्रत्यक्षात पोलिसांना जमिनीवर राहून काम करावे लागते. त्यासाठी त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणाबरोबरच प्रसंगावधनाच बाळगावे लागते असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतील उप-निरिक्षकांच्या 118 व्या सत्राचा दीक्षांत संचलन समारंभ पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. खडतर प्रशिक्षण पूर्ण करताना जल्लोष होणारच. पण बेहोश होऊन चालणार नाही. जोश आणि होश यांचे तारतम्य बाळगावे लागेल. त्यासाठी भानावर राहावेच लागेल, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

   खडतर प्रशिक्षणानंतर आपण एखादी गोष्ट कमावतो. त्याचा आनंद मोठा असतो. आजचा कार्यक्रम गेल्यावर्षी प्रत्यक्ष अनुभवला आहे. अंगावर रोमांच येतात. भारावून जाणारा समारंभ असतो. शिस्त आणि देखणेपणाचा अनोखा संगम या समारंभात असतो. आज मात्र मास्क घालूनच हा कार्यक्रम करावा लागतो. पोलीस दलाचे हेच महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. शिस्त आणि नियमांचे पालन करत आहोत. आजच्या समारंभातून कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम अधिकारी महाराष्ट्राला देत आहोत. आपले शूर जवान टोकाच्या गडचिरोलीत सुद्धा नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करताहेत. त्यांना टिपताहेत. महाराष्ट्राच्या मुळावर उठणार्‍यांचा बंदोबस्त करण्यासाठी काम करत आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी कौतुक केलं.  खडतर प्रशिक्षणानंतर आपण एखादी गोष्ट कमावतो. त्याचा आनंद मोठा असतो. आजचा कार्यक्रम गेल्यावर्षी प्रत्यक्ष अनुभवला आहे. अंगावर रोमांच येतात. भारावून जाणारा समारंभ असतो. शिस्त आणि देखणेपणाचा अनोखा संगम या समारंभात असतो. आज मात्र मास्क घालूनच हा कार्यक्रम करावा लागतो. पोलीस दलाचे हेच महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. शिस्त आणि नियमांचे पालन करत आहोत. आजच्या समारंभातून कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम अधिकारी महाराष्ट्राला देत आहोत. आपले शूर जवान टोकाच्या गडचिरोलीत सुद्धा नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करताहेत. त्यांना टिपताहेत. महाराष्ट्राच्या मुळावर उठणार्‍यांचा बंदोबस्त करण्यासाठी काम करत आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी कौतुक केलं.
   एका बाजुला नक्षलवादाचा आणि दुसर्‍या बाजुला करोनाचा मुकाबला करताहेत. दिसणार्‍या शत्रुवर तुटून पडता येते. पण ही शस्त्र करोनाविरोधात चालत नाहीत. कारण तो न दिसणाऱा शत्रु आहे. पण हे आव्हानही पोलीसांनी स्वीकारले आहे. समाजासाठी, लोकांसाठी ते कोरोना काळातही कर्तव्य बजावत आहेत.प्रशिक्षणार्थींनी खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या तेरा महिन्यांच्या प्रशिक्षणातून त्यांनी सद़ृढ शरीर कमावलेच आहे. पण निरोगी आणि निकोप मनही या सेवेसाठी आवश्यक ठरते. कारण सेवा करताना पोलिसांना अनेक भूमिका बजावाव्या लागतात. चित्रपटात दाखवतात आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. प्रत्यक्षात पोलिसांना जमिनीवर राहून काम करावे लागते. त्यासाठी त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणाबरोबरच प्रसंगावधनाच बाळगावे लागते. कारण पोलिसांच्या प्रत्येक कृतीवर प्रश्न विचारला जातो. केले तर का केले आणि नाही केले, तर का नाही. त्यामुळे खडतर प्रशिक्षणातून मनशक्ती मिळावावी लागते. त्यासाठी इच्छाशक्तीही महत्वाची ठरते, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. प्रशिक्षणार्थींनी स्वतःहून हे आयुष्य निवडलं आहे. ते साधसुधं नाही. यातून त्यांनी त्यांच्याकडे आत्मविश्वास आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे स्वतःहून हे क्षेत्र निवडण्यासाठी आणि कुटुंबापासून दूर राहून खडतर प्रशिक्षण पूर्ण करणार्‍या या प्रशिणार्थींना मानाचा मुजराच करावा लागेल. तुम्ही एक स्वप्न पाहिलं होते. आणि त्या स्वप्नातल्या जगात पहिले पाऊल टाकत आहेत. तेही निधड्या छातीने. करोनाचा विषाणू जसा आपले रुप बदलतो आहे. त्याचा आता सेकंड म्युटंट आला आहे. तसेच काहीसे आता रुप बदलणारी गुन्हेगारी आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here