टोल नाका शिवसेनेने पाडला. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 4, 2021

टोल नाका शिवसेनेने पाडला.

 नगर जामखेड रोडवरील टाकळी काझी येथील...

टोल नाका शिवसेनेने पाडला.

नारायणडोहो -
नगर जामखेड रस्ता आता चांगला झाल्याने वाहन धारक अतिशय वेगाने वाहने चालवतात अशातच टाकळी काझी येथे रस्त्याच्या मधोमध टोल नाक्याची इमारत तशीच उभी होती. मागील पंधरा दिवसात त्या ठिकाणी 4 अपघात झाले, परवाच एक ट्रुक त्यावर चढून रस्त्यावर पलटी झाला मोठे आर्थिक नुकसान झाले. सदेवाने प्राणहानी झाली नाही

   शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांना टाकळी काझी ग्रामस्थांनी हा बंद असलेला टोलनाका हटविण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली, त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन सदर बाब महामार्ग अधिकार्‍यांना सांगितली त्यांनी कार्यवाही करतो असे सरकारी उत्तर दिले. अजून अपघात होऊन प्राणहानी होण्यापेक्षा स्वतः संदेश कार्ले व शिवसैनिकांनी आक्रमक होत ताबडतोब जेसीबी व ट्रॅक्टर बोलावून टोल नाका उद्धवस्त केला व जनतेचे अपघात होण्याचा धोका टाळला. शिवसेनेच्या ह्या धडक कृतीमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
   शिवसेना उप तालुकाप्रमुख शंकर ढगे, टाकळीचे उपसरपंच अविनाश ढगे, अशोक ढगे, संभाजी आटोळे, विशाल ढगे, सदाशिव म्हस्के, हेमंत गावडे, हर्षल ढगे, संतोष ढगे व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत टोल नाका पाडण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here