आयुक्त आपल्या अनुभवातून शहराच्या विकासास चालना देतील - डॉ.सुदर्शन गोरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 26, 2021

आयुक्त आपल्या अनुभवातून शहराच्या विकासास चालना देतील - डॉ.सुदर्शन गोरे

 आयुक्त आपल्या अनुभवातून शहराच्या विकासास चालना देतील - डॉ.सुदर्शन गोरे

श्री संत सावता माळी युवक संघाच्यावतीने सत्कार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर शहराला ऐतिहासिक पार्श्वभुमी आहे, त्यामुळे नगर शहरात अनेक पर्यटक येत असतात. मनपाच्या माध्यमातून विविध उपक्रमांतून नागरिकांना सोयी-सुविधा पुरविल्या जात आहेत. अनेक वसाहती निर्माण होत असल्याने नगर शहर विकसित होत आहे. मनपा आयुक्त म्हणून नियुक्त झालेले श्री.शंकर गोरे हे आपल्या प्रदिर्घ अनुभवातून विविध योजनांच्या माध्यमातून नगर शहर आणखी विकसित करतील. शहरातील प्रश्न सोडवून नागरिकांना सोयी-सुविधा पुरवतील, असा विश्वास श्री संत सावता माळी युवक संघाचे मार्गदर्शक डॉ.सुदर्शन गोरे यांनी केले.
श्री संत सावता माळी युवक संघाच्यावतीने मनपाचे नूतन आयुक्त शंकर गोरे यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी डॉ.सुदर्शन गोरे, जिल्हाध्यक्ष अशोक तुपे, हितेश धाडगे, आदेश सत्रे, पोपट बनकर आदि उपस्थित होते. सत्कारा उत्तर देतांना आयुक्त शंकर गोरे म्हणाले, नगर शहरातील विविध गोष्टी ऐकून होता. आता प्रत्यक्ष काम करतांना जे-जे अनुभव येतील, त्यानुसार काम करु. मुलभुत सुविधांबरोबरच शासनाच्या विविध योजना शहर विकासासाठी राबवून स्मार्ट सिटी करण्याचा आपला प्रयत्न राहिल. सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शहरात विविध उपक्रम राबवू, असे सांगितले. याप्रसंगी अशोक तुपे यांनी संघाच्या कार्याची माहिती दिली.  हितेश धाडगे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment