‘एनआयए’च्या हाती वाझेंची डायरी; त्या 100 कोटींचं गुपित उघडणार? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 23, 2021

‘एनआयए’च्या हाती वाझेंची डायरी; त्या 100 कोटींचं गुपित उघडणार?

 ‘एनआयए’च्या हाती वाझेंची डायरी; त्या 100 कोटींचं गुपित उघडणार?


मुंबई -
एनआयएला तपासात सचिन वाझे यांच्या कार्यलयातून एक डायरी मिळाली आहे. या डायरीमध्ये पैशांच्या व्यवहाराबद्दल एन्ट्री केल्याचं दिसत आहे. तसंच कोडवर्डमध्ये एन्ट्री केल्याचं दिसत आहे. बार, रेस्टॉरंट्स आणि इतर गोष्टींमधून गोळा झालेल्या पैशांच्या व्यवहाराची ही डायरी असू शकते, असं एनआयएला वाटत आहे. त्यामुळे ही डायरी 100 कोटींचं गुपित उघडणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. सचिन वाझेंच्या डायरीतून हफ्त्याची गुपितं उघडकीस येण्याची शक्यता आहे. कुणाला किती पैसे जात होते, याचा हिशेब सचिन वाझे ठेवत होते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. डायरीत मुंबईतील सर्व बार, पब आणि हुक्का पार्लरची यादी आहे. ज्यांनी पैसे दिले त्याबाबत कोड भाषेत नोंद आहे. लाखाच्या नोंदीसाठी ङ, तर हजाराच्या नोंदीसाठी घ हे अक्षर वापरलं आहे. बार, पब, हुक्का पार्लर यांची येणारी रक्कम आणि दिलेली रक्कमही लिहिली आहे. पैशाचं वाटप नियमित होत होतं. त्याबाबतही कोड भाषेत नोंद आहे. व्यक्तीऐवजी विभाग लिहिण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here