पो. नि. यादव यांनी बोठेबरोबर दहा तास गप्पा मारत आणले नगरला ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 16, 2021

पो. नि. यादव यांनी बोठेबरोबर दहा तास गप्पा मारत आणले नगरला !

 पो. नि. यादव यांनी बोठेबरोबर दहा तास गप्पा मारत आणले नगरला !


नगरी दवंडी/प्रतिनिधी

कर्जत ः रेखा जरे हत्याकांडाचा फरार आरोपी बाळ बोठे यास पकडल्यानंतर त्याची मानसिकता अत्यंत ढासळलेली होती त्यामुळे त्याला नगर पर्यत आणणे अत्यंत जिकरीचे काम होते. त्यामुळे बोठे यास ताब्यात घेतल्या पासून आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावत त्याच्या बरोबर विविध विषयांवर चर्चा करत सलग दहा तास गप्पा मारून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी त्यास नगर येथे आणले या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती यादव यांनी कर्जत येथे पत्रकारांशी गप्पा मारताना दिली.
   कर्जत पोलीस स्टेशनचे दि 10 मार्च रोजी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी इंस्पेक्षन केले व दुपारी परतत असताना कर्जत पोलीस स्टेशनचे पो. नी. चंद्रशेखर यादव यांना बॅग भरून सोलापूर कडे  रवाना होण्याचे आदेश दिले, व यातून सुरू झाला अविस्मरणीय प्रवास. यादव यांना सोलापूर मध्ये गेल्या नंतर हैद्राबाद कडे जाण्याचा आदेश मिळाला तेथे अगोदरच पोलिसांच्या काही टीम कार्यरत होत्या यादव यांनी त्यात सहभागी होत काम सुरू केले. आरोपी बोठेस हैद्राबाद मध्ये हायकोर्टात प्रॅक्टिस करणारा वकील मदत करत होता त्यामुळे पोलिसांपुढे अनेक अडचणी येत होत्या त्यात वेळोवेळी सुधारणा करत मार्ग काढला जात होता,  नगर येथून सतत वरिष्ठांचे  मार्गदर्शन ही मिळत होते, तहान भूक विसरून पोलीस यंत्रणा काम करत होती व अखेरीस आरोपी ताब्यात घेण्यास सुरुवात कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना यश आलेच. त्यानंतर सुरू झाला परतीचा प्रवास मात्र दरम्यान बोठेची मानसिकता विचलित झालेली होती, त्याच्या खिशात व साहित्यात जागोजाग आपल्या कुटुंबीयाचा पत्ता लिहिलेल्या चिठ्या सापडत होत्या त्यामुळे ताब्यात आल्यापासून नगर पर्यत जाई पर्यत बोठे ने कोणताही अनुचित प्रकार करू नये म्हणून त्यास कोणतीही संधी च दिली गेली नाही हैद्राबाद ते नगर या दरम्यान दहा तास बोठे बरोबर आम्ही मनसोक्त गप्पा मारल्या यामध्ये एक राजकारण, पत्रकारिता, पोलीस, समाजकारण अशा विविध विषयावर बोलताना त्याच्या डोक्यावरचे ओझे हलके होण्यासाठी काही लोकांना फोन ही लावून दिले त्याच्याशी मोकळेपनाने बोलू  दिले, त्यास धीर दिला, आलेल्या प्रसंगाला तोंड द्यावेच लागते, आपले कुटुंब आहे, संपत्ती आहे त्याकडे लक्ष द्यावे लागेल, अनेक लोक अशा प्रसंगांना तोंड देत असतात त्यामुळे तुम्हाला ही तोंड द्यावे लागेल असे समजावल्या नंतर बोठे अक्षरशः रडला, या दरम्यान त्याच्या मित्राबाबत ओळखीच्या व्यक्तीबाबत गप्पा मारल्या, त्याला वाटत होते आपल्याला इकडेच कोर्टात हजर करावे नगरला नेऊ नये, यादरम्यान पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल सतत संपर्कात होते. आम्ही एक मिनिटही बोठेला मोकळे सोडले नाही, अशा अनेक बाबी सांगत माणसाची नीतिमत्ता खराब झाली की तो व्यक्ती वाहत जातो, त्यामुळे आपला उद्देश चागला पाहिजे अन्यथा कितिही पैसा, असला कितीही अधिकार असले, ओळखी असल्या, नाव असले तरी त्याचा उपयोग होत नाही, आज पर्यंत अनेक गुन्ह्या चा तपास लावला मात्र हा अनुभव अत्यंत वेगळा होता या प्रकरणात मोठे प्रेशर होते व आज पर्यंत एखाद्या प्रकरणात वरिष्ठांनी एवढा पाठपुरावा केल्याचे मीव तरी पाहिले नाही त्यामुळे यात यश आले असे ही यादव सांगण्यास विसरले नाहीत या1 प्रकरणात कर्जत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक चंद्र शेखर यांनी पहिला हाथ बोठे पर्यत पोहचल्याने त्याचे व त्याच्या टीम मधील कर्जत पोलीस स्टेशनचे कर्मचारी सुनील खैरे व श्यामसुंदर जाधव याचा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रशस्तीपत्र देऊन नगर येथे गौरव केला.

No comments:

Post a Comment