कर्जतमध्ये टेरेस गार्डन स्पर्धा, प्रबोधनकार संस्थेचा पुढाकार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 4, 2021

कर्जतमध्ये टेरेस गार्डन स्पर्धा, प्रबोधनकार संस्थेचा पुढाकार

 कर्जतमध्ये टेरेस गार्डन स्पर्धा, प्रबोधनकार संस्थेचा पुढाकार


नगरी दवंडी/प्रतिनिधी

कर्जत ः माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत कर्जत शहरात अनेक दिवसापासून कर्जत नगरपंचायत व अनेक संघटना व महिला ग्रुपच्या माध्यमातून सुरु असलेल्या स्वच्छता अभियाना मुळे कर्जत शहराचा चेहरामोहरा बदलत असून मोठ्या प्रमाणात स्वच्छतेविषयी जनजागृती होत आहे परंतु प्रत्येक घरातून रस्त्यावर येणारा कचरा व या कचर्‍या ने शहरात होणारी अस्वच्छता याच बरोबर शिळे अन्न, भाज्या, सुका कचरा व इतर सर्व कचरा  घराघरात रोखला गेला तर आणि त्यावर प्रक्रिया करून खत बनवले तर नक्कीच मोठा फायदा होणार आहे. याशिवाय
आपण रोज खात असलेल्या रासायनिक खताच्या भाज्या, फळे याला पर्याय म्हणून काही प्रमाणात का होईना सेंद्रिय भाज्या आणि फळे खायला मिळू शकनार आहेत, व आपले आरोग्य ही उत्तम राहू शकते. आपण यातूनही माझी वसुंधरा व स्वच्छ भारत अभियानात आपला सहभाग ही नोंदवू शकतो. यासाठी आपण अगदी कमी जागेत आपल्या घरासमोरील परसबाग अथवा घरावरील टेरेस बाग फुलवून आपले कर्जत शहर स्वच्छ, सुंदर व हरित  करू शकतो.                  
   कर्जत शहरातील घरा घरात ही संकल्पना पोहचविण्यासाठी व टेरेस गार्डन वा परसबागेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रबोधनकार क्रीडा व सांस्कृतिक ग्रामीण सेवाभावी प्रतिष्ठान कर्जत व  नगरपंचायत कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने माझा कचरा.... माझी जबाबदारी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.  कर्जत शहर व उपनगरातील प्रत्येक कुटुंबाला या स्पर्धेत सहभाग घेता येईल व आपले शहर स्वच्छ, सुंदर, हरित कर्जत करता येईल यासाठी प्रथम बक्षीस - 7001, द्वितीय बक्षीस -5001,  तृतीय बक्षीस - 3001,  प्रोत्साहनपर ठेवण्यात आलेली आहेत. स्पर्धेचा कालावधी: -  25 फेब्रुवारी ते 15 एप्रिल 2021 असून सहभागी होणार्‍या  स्पर्धकांना माझी वसुंधरा अभियानाचे प्रशस्तीपत्रक,  प्रबोधनकार संस्थेचे प्रमाणपत्र व डस्टबिन ( कचराकुंडी) देण्यात येईल. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सचिन पोटरे यांनी दिली आहे. नाव नोंदणी साठी श्रीकृष्ण केबल नेटवर्क फोन नंबर - 02489 -222827 , कर्जत नगरपंचायत - 02489 -222112 वर सम्पर्क साधावा व या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त कुटुंबियानी सहभाग घ्यावा व आपले कर्जत स्वच्छ सुंदर हरित कर्जत करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन ही पोटरे यांनी केले आहे.गेली काही महिण्यात सौ सुवर्णा सचिन पोटरे यांनी आपल्या टेरेस वर 300 झाडाचे टेरेस गार्डन अत्यंत यशस्वी रित्या फुलविले असून जर याबाबत कोणाला अधिक माहिती हवी असेल, कसे करायचे, टेरेस गार्डन कसे केले आहे हे पहायचे असेल तर त्यांनी पोटरे कुटुंबियांशी सम्पर्क साधावा ते याबाबत संपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत.

No comments:

Post a Comment