बेनवडीमध्ये 21 दिवसापासून श्रमदान करत केली जातेय स्वच्छता - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 20, 2021

बेनवडीमध्ये 21 दिवसापासून श्रमदान करत केली जातेय स्वच्छता

 बेनवडीमध्ये 21 दिवसापासून श्रमदान करत केली जातेय स्वच्छता


कर्जत ः
गावाला स्वतः ची ओळख निर्माण करण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे असून यासाठी गेली काही दिवसांपासून ग्राम पंचायतीच्या सर्वासह युवकांना बरोबर घेऊन काम करत असल्याची माहिती सरपंच पोपटराव धुमाळ यांनी दिली.

    कर्जत तालुक्यातील बेनवडी मध्ये 28 फेब्रु. पासून अनेक जण दररोज सकाळी श्रमदान करत स्वच्छता करत आहेत, सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, बेनवडी कोळवडीतील सर्व युवक या गेली 21 दिवसापासून सुरू असलेल्या अभियानात  अविरत सहभागी असून या माध्यमातून गावाचे रूप पालटू लागले आहे.  सरपंच पोपटराव धुमाळ यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या अभियानात उपसरपंच भोसले, औदुंबर भोसले, ग्राम पंचायत सदस्य विश्वासराव डमरे, ग्राम पंचायत सदस्य महादेव गदादे, ग्राम पंचायत सदस्य पप्पू दवणे, ग्राम पंचायत सदस्य सचिन खुडे, ग्राम पंचायत सदस्य मच्छीद्र गायकवाड, मेेजर तात्यासाहेब देशमुख, सोनाजी गायकवाड, बाळासाहेब गदादे, कैलास क्षीरसागर, बाळासाहेब दवणे महाराज, सोमनाथ डमरे, कैलास दवणे, बापू दवणे, बाळू गायकवाड,  मच्छींद्र गदादे, रंधील मिस्त्री, नाना कांबळे, बाप्पू गदादे, बाळू कवडे, गणेश चौगुले, ऋषी थोरात, आदींसह अनेक ग्रामस्थ या अभियानात सहभागी होत आहेत. यावेळी आनंद बलदोटा उपस्थित होते.
   गावात मोठ्या प्रमाणांत वेड्या बाभळी व गवत होते पडक्या वाड्या मुळे गाव भयावह वाटत होते एका ठिकाणा हुन दुसर्‍या ठिकाणची घरेही दिसत नव्हती त्यामुळे गावात सर्वाना बरोबर घेऊन काम करण्याचा निर्णय घेतला, सर्वाना या कामास सहकार्य केले युवक ग्रामस्थ जोडले जाऊ लागले असून गावात गेली 21 दिवसात बराच बदल दिसू लागले लागला आहे, आगामी काळात अनेक ठिकाणी बदल होत करायचे असून नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी सरपंच पोपटराव धुमाळ यांनी केले. याप्रसंगी मेजर तात्यासाहेब देशमुख, ग्राम पंचायत सदस्य विश्वासराव डमरे, माजी ग्राम पंचायत सदस्य मच्छीद्र गदादे यांनी मनोगते व्यक्त केली. स्वच्छताप्रेमी श्रमप्रेमी आशिष बोरा यांनी मनोगत व्यक्त करताना या अभियानाला उंची देण्यासाठी सर्वाना मतभेद, हेवेदावे, गटतट, राजकारण, मोठेपण, बाजूला ठेवावे लाागेेल, कोणालाही दोष देऊ नये आपण आपले काम करत राहायचे असे सांगत ग्राम विकासातील अनेक बारकावे विशद केले. शेवटी सर्वानी जोरदार घोषणाबाजी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here