बिनविरोध सदस्य ते बिनविरोध सरपंचपद मिळवत ग्लोबल चेंजमेकर पुरस्काराच्या मानकरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 2, 2021

बिनविरोध सदस्य ते बिनविरोध सरपंचपद मिळवत ग्लोबल चेंजमेकर पुरस्काराच्या मानकरी

 बिनविरोध सदस्य ते बिनविरोध सरपंचपद मिळवत ग्लोबल चेंजमेकर पुरस्काराच्या मानकरी


नगरी दवंडी/प्रतिनिधी

कर्जत ः सिद्धटेक ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. पल्लवी सुजित गायकवाड यांनी महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये बिनविरोध सदस्य आणि बिनविरोध सरपंच निवडून येत राज्यात इतिहास रचल्याने देशाचे माजी गृहमंत्री व माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते ग्लोबल चेंजमेकर अवार्ड देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.प्रोजेक्ट 100,दिल्ली आणि मानिनी फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई येथील हॉटेल योगी मिडटाऊन येथे देश विदेशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला यावेळी पद्मश्री डॉ गिरीश प्रभुणे, पद्मश्री डॉ विजय कुमार शहा,सनदी अधिकारी रंगनाथ नाईकडे उपस्थित होते.
   जागतिक स्तरावर सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या प्रोजेक्ट 100 या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून 15 देशातील आरोग्य, खेळ, पर्यावरण, सामाजिक, शिक्षण, औद्योगिक, व्यापार, स्वयंसेवी संस्था, सी. एस. आर मानव अधिकार इत्यादी क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी बजावत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणार्‍या लोकांना आणि मार्टिन ल्युथर किंग,नेल्सन मंडेला,महात्मा गांधी सारख्या महान व्यक्तींना समर्पित असलेला ग्लोबल किंगमेकर अवार्ड 15 देशातील 100 व्यक्तींना देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
   यावेळी पल्लवी गायकवाड म्हणाल्या की, आपल्याला मिळालेला पुरस्कार हा सिद्धटेक ग्रामस्थांना समर्पित करते आहे. माझ्या कुटुंबीयांनी मला साथ दिली नसती तर हे शक्य झाले नसते त्यामुळे मी माझ्या कुटुंबियांचे आणि समस्त सिद्धटेक बेर्डी ग्रामस्थांचे आभारी आहे कि माझ्या आयुष्यात हा सोनेरी क्षण केवळ तुमच्यामुळे पाहावयास मिळाला.या पुरस्काराने मला काम करण्यास आणखी ऊर्जा प्राप्त झाली असून माझ्यावर जबाबदारी वाढली आहे त्यामुळे सिद्धटेक ग्रामपंचायत मध्ये काम करत असताना आमदार रोहित पवार आणि जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे प्रतिपादन गायकवाड यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here