खर्डा येथील मुस्लिम समाजाच्या लग्नविधीसाठी शादीखान्याची गरज - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 16, 2021

खर्डा येथील मुस्लिम समाजाच्या लग्नविधीसाठी शादीखान्याची गरज

 खर्डा येथील मुस्लिम समाजाच्या लग्नविधीसाठी शादीखान्याची गरज

आमदार रोहित पवार यांनी विशेष पाठपुरावा करावा
नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा गावात बहुसंख्येने राहत असलेल्या मुस्लिम समाज बांधवांना आपल्या मुला मुलींच्या लग्नविधी करण्याकामी शादीखाना मंगल कार्यालयाची अत्यंत गरज असुन कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांनी विशेष लक्ष देऊन मंजुरीसाठी पाठपुरावा करावा अशी मागणी खर्डा येथील मुस्लिम समाज बांधवाकडुन होत आहे.
    आपल्या लाडक्या मुला मुलींच्या लग्नविधी कार्यक्रमासाठी खर्डा येथे गैरसोय होत असल्याकामी अनेकदा बाहेरगावी हा विधी पार पाडला जातो अशावेळी येण्याजाण्यासाठी लाखो रूपये खर्च होतात व लग्नविधीसाठी खुप हाल व ञास होत आहे,तर गोरगरिब सर्व सामांन्य कुटुंबातील लग्नविधीसाठी बाहेरगावी उचलुन लग्नकऱण्याकामी पैसा आणायचा कोठुन असा प्रश्न मुस्लिम समाजातील नागरिकांना पडला आहे.
लोकप्रिय दमदार आमदार रोहित पवार यांनी शादीखाना मंगल कार्यलयासाठी विशेष लक्ष देऊन पाठपुरावा करून लवकरात लवकर मंजुर करावा व मुस्लिम समाजाला न्याय द्यावा अशी मागणी बागवान यंग ग्रुप खर्डा येथील पञकार रिजवान बागवान,हजरत बागवान,रशिद बागवान,अन्वर बागवान,जावेद बागवान,आसिफ बागवान,आरिफ बागवान,फिरोज बागवान,नय्युम बागवान,शाहरूख बागवान,मैन्नुद्दीन बागनान,जुबेर बागवान,बिलाल बागवान,मोहिन बागवान आदिंनी केली आहे.

No comments:

Post a Comment