सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारींच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, March 4, 2021

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारींच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

 सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारींच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम


नगरी दवंडी/प्रतिनिधी

जामखेड ः तालुक्यातील कोठारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय कोठारी हे अविरत सामाजिक कार्य करत असुन अपघातात अनेकांचे प्राण वाचवले त्याचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन बारामती अ‍ॅग्रोच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांनी केले
   शहरातील महावीर भवन येथे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार व ओम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान व तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते यावेळी बारामती अ‍ॅग्रोच्या विश्वस्त सुनंदाताई पवार. विहारधाम योजनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार भटेवरा जैन कॉन्फरन्सचे रमेशचंद्र बाफना. वारकरी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष महंत राधाताई महाराज. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी.ओम हॉस्पिटलचे संचालक डॉ भरत दारकुंडे डॉ सचिनकुमार राजपुत्र डॉ सुरज तौर. डॉ अर्जुन शेळके. संजय बाफना. संतोष भनगडे अमोल लोहकरे प्रशांत मोराळे ,सुभाष भंडारी, संतोष लोढा, संजय नहार तेजस कोठारी हर्षल कोठारी आनंद गुंदेचा, अशोक पितळे ,संजय टेकाळे ,प्रफुल्ल सोळंकी महेश आडाले ,विठ्ठल राऊत आदि सह नागरिक उपस्थित होते
यावेळी पत्रकारिता क्षेत्रात ओंकार दळवी. महेश बेदरे. समिर शेख. मिठुलाल नवलाखा. अनिल गायकवाड यांना सुनंदाताई पवार यांच्या हस्ते राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी मोफत सर्व रोग निदान व तपासणी शिबीराचा 150 नागरिकांनी लाभ घेतला यावेळीअंतरवली येथील संत ज्ञानेश्वर माउली वृध्दाश्रमातील गहीनाथ लोखंडे वृध्दांना किराणा वाटप करण्यात आले
यावेळी बोलताना सुनंदाताई पवार म्हणाल्या की कोठारी कुटुंबांने पिढानं पिढ्या समाज कार्य करत आले असून त्याचा वसा संजय कोठारी हे करत आहेत त्यानी आतापर्यंत अपघातात अनेक नागरिकांना जिवनदान देण्याचे काम करत आहे कोठारी हे गेल्या 25 वर्षा पासुन विवीध प्रकारे सामाजिक कार्य करत आहेत. मोफत रूग्णवाहिका , अपघातातील जखमींना  मदत,, कैद्यांना मिठाई , लग्न जमविने , अपघात ग्रस्तांना आर्थिक मदत , गुणवंत विद्यार्थी सत्कार असे विवीध सामाजिक उपक्रम राबविले. यावेळी राधाकिसन गोरे दिनेश दळवी करमाळा, नेकानी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन संतोष सरसमकर आणि निलेश दिवटे यांनी केले.

No comments:

Post a Comment