जामखेड शहरात गावठी हातभट्टीच्या भट्ट्या केल्या उद्ध्वस्त - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 9, 2021

जामखेड शहरात गावठी हातभट्टीच्या भट्ट्या केल्या उद्ध्वस्त

 जामखेड शहरात गावठी हातभट्टीच्या भट्ट्या केल्या उद्ध्वस्त

जामखेड पोलीसांची कारवाई

नगरी दवंडी/प्रतिनिधी

जामखेड ः जामखेड शहरातील कुंभारतळ व एस.टी.स्टॅण्ड पाठीमागील सदाफुले वस्तीवर गावठी हातभट्ठीच्या भट्टया असुन त्यामुळे तेथील महिलांना खुप त्रास होत आहे.अशा प्रकारची महिलांची तोंडी तक्रार पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना प्राप् झाल्याने त्यांनी आज महिला दिनाचे औचित्य साधुन सकाळी 06/00 वा. सदर ठिकाणी छापा टाकला असता सुमारे 39 हजार रुपये किमतीचे दारू तयार करण्याचे कच्चे रसायण व 7 हजार रू.किमंतीची गावठी  हातभटटीची तयार दारूचा नाश करून दारूच्या हातभटटया पुर्णपणे उदध्वस्थ करण्यात आल्या.आज दि.8/3/2021 रोजी सकाळी 06/00 वा. मा.पोलीस अधिक्षक मनोज पाटील सो. व मा.अपर पोलीस अधिक्षक श्री.सौरभ अग्रवाल  व डि वाय एस पी. श्री.आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस स्टेशनचे पो.नि.संभाजी गायकवाड यांना मिळालेल्या गुप्त माहीतीवरून पोसई. राजेंद्र थोरात, पोना.ज्ञानदेव भागवत , पोकॉ. अविनाश ढेरे, पोकॉ.संग्राम जाधव, पोकॉ. संदिप राऊत, पोकॉ. विजय कोळी, पोकॉ. आबासाहेब आवारे, पोकॉ.अरूण पवार, मपोकॉ.मनिषा दहिरे असे स्टापसह जामखेड शहरातील कुंभारतळ व एस.टी.स्टॅण्ड पाठीमागील सदाफुले वस्ती येथे छापा टाकून सुमारे 39 हजार रुपये किमतीचे दारू तयार करण्याचे कच्चे रसायण व 7 हजार रू.किमंतीची गावठी  हातभटटीची तयार दारू असे एकून 46 हजार रूपयाचे दारू व रसायण नष्ट करून जामखेड पो.स्टे.येथे खालीलप्रमाणे  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
    आरोपी  अश्विनी अनिल पवार,  बेबी रविंद्र पवार, सिताराम मनोहर पवार सर्व रा.कुंभारतळ,जामखेड रावसाहेब हिरामण पवार, विजय आत्माराम शिंदे,  सुमन कल्याण ऊर्फ बबन काळे सर्व रा.बस स्टॅण्ड पाठीमागे,हंगे हॉस्पिटलसमोर जामखेड वरीलप्रमाणे 6 गुन्हे दाखल करण्यात आले असुन.सदर गुन्हयाचा पुढील तपास पोनि.संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.शिवाजी भोस व पोना.किरण कोळपे हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here