‘गाव लई जोरात’च्या वेबसीरीजचा प्रोमो लाँच जामखेडच्या स्थानिक कलाकारांना मिळाली संधी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 16, 2021

‘गाव लई जोरात’च्या वेबसीरीजचा प्रोमो लाँच जामखेडच्या स्थानिक कलाकारांना मिळाली संधी

 ‘गाव लई जोरात’च्या वेबसीरीजचा प्रोमो लाँच जामखेडच्या स्थानिक कलाकारांना मिळाली संधी


नगरी दवंडी/प्रतिनिधी

जामखेड ः जामखेड तालुक्यातील स्थानिक कलाकारांना घेऊन नुकताच गवा लई जोरात या वेबसीरीज चा प्रोमो लॉन्च करण्यात आला आहे. सदरची वेबसीरीज याच महिन्यात 20 मार्च रोजी युट्यूबवर पहावयास मिळणार आहे.
    एस के फील्म प्रॉडक्शन निर्मित गाव लय जोरात या वेबसीरीज च्या प्रोमो चे आज सोमवार दि.15 मार्च रोजी शिक्षक संजय कडुस व ओंकार दळवी यांच्या हस्ते फित कापुन संपन्न झाला. यावेळी या वेबसीरीज चे निर्माता शाहदेव तागड, कथा पटकथा आणि संवाद  जितेन्द्र आढाव, प्रमुख कलाकार दिपक तुपेरे, रजनीकांत साखरे, सुशील पौड, शिरिश कदम, अविनाश बोधले, कला दिग्दर्शक अनिल खेत्रे, कुंडल राळेभात, विनोद घायतडक, सौ. संगिता पुलावळे, चिन्मय राजगुरू, सागर भांबरे, विजयकुमार जाधव, धनराज पवार, संजय वारभोग, बाळु माने, अमोल काशिद, योगेश भोगे, कु. साक्षी लोंढे व कु. भक्ती कोहकडे सह इतर मान्यवर उपस्थित होते.
    याप्रसंगी बोलताना वेबसीरीज चे निर्माते शाहदेव तागड म्हणाले की जामखेड च्या मातीतील व ग्रामीण भागातील उत्कृष्ट कलाकारांना कलेचे व्यासपीठ मिळावे व त्यांच्या कलेला उत्तेजन मिळावे या उद्देशाने आम्ही एस के फील्म प्रॉडक्शन द्वारे वेबसीरीज ची निर्मिती करत आहोत. तसेच या पुढेही शार्ट फील्म, वेबसीरीज, ची निर्मिती चालुच ठेऊन लवकरच मोठ्या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. सदरची वेबसीरीज ही या मार्च महीन्याच्या 20 तारखेपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तसेच या वेबसीरीज चे भाग दरमहिन्याच्या दि 1, 10 व 20 तारखेला युट्यूबवर नियमित पहावयास मिळतील अशी माहिती दिग्दर्शक जितेंद्र आढाव व दिपक तुपेरे सर यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here