चार पिस्टल; सहा जीवंत काडतुसांसह दोघांना अटक. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 13, 2021

चार पिस्टल; सहा जीवंत काडतुसांसह दोघांना अटक.

 जामखेड पोलिसांची मोठी कारवाई...

चार पिस्टल; सहा जीवंत काडतुसांसह दोघांना अटक.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

जामखेड ः जामखेड शहरात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर पावले उचलत जामखेड पोलीसांनी मोठी कारवाई केली आहे. शहरातील दोन तरुणांनी विक्रीसाठी आणलेली 1 लाख रुपये कीमतीचे चार पिस्टल व सहा जीवंत काडतुसे जप्त करत दोन तरूणांना अटक करण्यात आली असून या मागे किती मोठे रॉकेट आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणामुळे मोठे रॅकेट उघड होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
   जामखेड शहरातील राहणारे ऋषी उर्फ (पप्पू) मोहन जाधव, वय 22 वर्षे राहणार जामखेड व दीपक अशोक चव्हाण, वय 32 वर्षे रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड यांना अटक करण्यात आली आहे. यातील ऋषी उर्फ (पप्पू) मोहन जाधव हा विनापरवाना बेकायदा मनाई केलेले 7.62 एम एम ची 25200 रुपये किमतीचे 1 अग्निशस्त्र पिस्टल व 2 जिवंत काडतुसे असे स्वतःहा जवळ बाळताना मिळून आला आहे. तसेच दुसरा आरोपी दीपक अशोक चव्हाण हा मनाई केलेले 70400 रुपये किमतीचे एकूण 3 पिस्टल व 4 जीवंत काडतुसे अशी विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगताना मिळून आला आहे. दि 12 रोजी पोलिसांनी ही पिस्टल आरोपींच्या घरी छापा टाकून जप्त केली आहेत. शहरात अनेक वेळा बेकायदेशीर रिव्हॉल्वर व गावठी कट्ट्यांचा वापर करून अनेक गुन्हे, तसेच खुन केल्याच्या घटनाही घडल्या आहेत त्यातच पुन्हा 4 पिस्टल पोलीसांनी जप्त केल्या आहेत. आता याचे मोठे रॉकेट तर नाही ना यांचा तपास सदर ची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. मनोज पाटील सो. मा. अपर पोलीस अधीक्षक श्री सौरभ अग्रवाल सो. व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग श्री. अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र थोरात, स. फौ. परमेश्वर गायकवाड, पोहेकॉ. संजय लाटे पोकॉ आबासाहेब आवारे, पोकॉ संग्राम जाधव, पोकॉ. अविनाश ढेरे, पोकॉ.विजयकुमार कोळी, पोकॉ अरुण पवार, पोकॉ संदीप राऊत, पोकॉ. संदीप आजबे, पोकॉ. सचिन देवढे पोकॉ सचिन पिरगळ पोकॉ. विष्णू चव्हाण यांनी केली आहे.
   पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अण्णासाहेब जाधव व पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोसई. राजेंद्र थोरात हे करीत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here