पवारसाहेबांच्या वाढदिवसाचे..आयुष्य वाचले हजारो रुग्णांचे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 4, 2021

पवारसाहेबांच्या वाढदिवसाचे..आयुष्य वाचले हजारो रुग्णांचे

 पवारसाहेबांच्या वाढदिवसाचे..आयुष्य वाचले हजारो रुग्णांचे

चार वर्षांपासून हृदयरोग शिबिरांचे आयोजन; राज्यभरातील रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया

नगरी दवंडी/प्रतिनिधी

जामखेड ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, देशाचे माजी कृषिमंत्री शरदचंद्र पवार व प्रतिभा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दि.12 नोव्हेंबरपासून 12 जानेवारीपर्यंत बारामती येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. रमेश भोईटे यांच्या एन. ए. बी. एच. अग्रमानांकित ’गिरीराज हॉस्पिटल’मध्ये हृदयरोग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या हृदयरोग शिबिरातून शेकडो रुग्णांवर विविध प्रकारच्या मोफत शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत.
   कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आ. रोहित पवार व डॉ. रमेश भोईटे यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शिबिरात मोफत अँजिओप्लास्टी, मोफत अँजिओग्राफी व मोफत हार्ट बायपास सर्जरी करण्यात आल्या आहेत.आ. रोहित पवार यांच्या पुढाकारातुन मोफत हृदयरोग शिबिराची संकल्पना राज्यभरातील रुग्णांना जीवनदान प्रदान करणारी ठरली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वडील कै.अनंतराव पवार यांच्या स्मृतीपित्यर्थ ’अनंत आरोग्य सेवा अभियान’ तसेच राज्यशासनाच्या ’महात्मा फुले आरोग्य योजना आणि कै.रा. तु. भोईटे स्मृती आरोग्य प्रतिष्ठाणच्या माध्यमातून शिबिरातील रुग्णांना आर्थिक मदत झाली आहे.हृदयरोगाबाबत असलेला अवाढव्य वैद्यकीय खर्च सामान्य कुटुंबातील नागरिकांना परवडणारा नाही त्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणीमुळे गंभीर आजारातून आपली सुटका करता येत नाही.प्रसंगी अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागते मात्र या शिबिरातून रुग्णांना नवजीवनाची संधी उपलब्ध झाली आहे.या शिबिरात पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका धारकांवर पुर्णपणे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.या शिबिराच्या माध्यमातून गोरगरिबांच्या कुटुंबांची कोट्यवधी रुपयांची झालेली बचत खर्‍या अर्थाने शरद पवार यांना शुभेच्छारुपी आशिर्वादच आहे. आ.रोहित पवार यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या शिबिरातून गोरगरिबांची, दिनदुबळ्यांची सेवा करण्याचा वारसा जिवंत ठेवला आहे. राज्यभरातील पुणे, मुंबई, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, सातारा, यवतमाळ, परभणी अशा अनेक जिल्ह्यातून आलेल्या रुग्णांची जेवणाची व निवासाची व्यवस्था देखील मोफत करण्यात आली होती. सन 2018 ते 2021 या चार वर्षात करण्यात आलेल्या शस्त्रक्रियांची आकडेवारी पुढीलप्रमाणे:
मोफत अँजिओग्राफी :
सन 2018 साली 250, सन 2019 साली 404, सन 2020 साली 422 सन 2021 साली 552  एकुण संख्या-1628
मोफत अँजिओप्लास्टी:
सन 2018 साली 103, सन 2019 साली 148, सन 2020 साली 153, सन 2021 साली 198 एकुण संख्या-602
हार्ट बायपास सर्जरी:
सन 2018 साली 35, सन 2019 साली 27, सन 2020 साली 40, सन 2021 साली 80 एकुण संख्या-182
इतर (डऊ, तडऊ,झऊ-,इचत,एझ डढणऊध) :-
सन 2018 साली 22, सन 2019 साली 22, सन 2020 साली 18, सन 2021 साली 00 एकुण संख्या- 62

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here