गुंडेगाव ग्रामवनमध्ये मोठा आर्थिक भ्रष्टाचार करण्याचा वनविभागाचा डाव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 30, 2021

गुंडेगाव ग्रामवनमध्ये मोठा आर्थिक भ्रष्टाचार करण्याचा वनविभागाचा डाव

 गुंडेगाव ग्रामवनमध्ये मोठा आर्थिक भ्रष्टाचार करण्याचा वनविभागाचा डाव


नगरी दवंडी/प्रतिनिधी

गुंडेगाव ः गुंडेगाव वनहद्दीमध्ये भ्रष्टाचाराचा डोंगरच पोखरण्याचे काम सध्या चालू आहे. गुंडेगाव येथे नुकतेच गुंडेगाव  ग्रामपंचायत मध्ये  सत्ता पलट झाल्यानंतर सुध्दा आजून जुनीच वनग्राम समिती बरोबर आर्थिक हितसंबंध आसून नविन ग्रामवन समिती नियुक्त करण्यासाठी कोणताही वनविभागाने  पत्र व्यवहार गुंडेगाव ग्रामपंचायत कडे केला नाही.वनक्षेत्रात  नव्याने  तालुका वनक्षेत्रपाल यांनी अंदाजे 30 लक्ष रुपये किंमतीचे बंधारे व डीप सीसीटी चे काम ठेकेदाराशी आर्थिक तडजोड करत बी.वन टेंडर प्रक्रिया पुर्ण करून अंदाजे रक्कम रूपये 2 लक्ष 96 हजार रुपयांचे सात वेगवेगळे टेंडर प्रक्रिया राबवण्याचा घाट घातला आसून या संदर्भात गुंडेगावचे उपसंरपच संतोष भापकर यांनी संपर्क साधला आसता वन विभागाच्या अधिकारी यांनी मुजोरीची भाषा वापरली व सदर गुंडेगाव वनक्षेत्रात मागिल काळात 15 माती बंधारे दुरुस्तीसाठी विधिमंडळात व अधिवेशनात हा विषय आसताना तसेच  जिल्हा अधिकारी व वनसंरक्षक यांचे तत्काळ दुरूस्तीचे आदेश आसताना सुध्दा  गुंडेगाव वनग्राम समिती मार्फत आजपर्यंत दुरूस्त झाले नसताना सुद्धा  वन अधिकारी यांनी मुजोरी करत नविन माती बंधारे बांधण्याचा घाट घातला आसून गुंडेगाव नागरिकांनी यासंदर्भात  तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
   यासंदर्भात गुंडेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने संरपच सौ. मंगल सकट, उपसंरपच संतोष भापकर,ग्रा.सदस्य नानासाहेब हराळ, संतोष धावडे, सतिश चौधरी, राहूल चौधरी, संतोष सकट यांनी नाराजी व्यक्त करून मागिल माती बंधारे दुरूस्त करावे मगच नविन माती बंधारे बांधण्यात यावे , नविन बंधारे बांधण्यासाठी कोणाचाही विरोध नसून मागिल कामे आधी पुर्ण करावीत अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here