गुंडेगाव वनक्षेत्रात वनविभागाचा मनमानी कारभार... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 27, 2021

गुंडेगाव वनक्षेत्रात वनविभागाचा मनमानी कारभार...

 गुंडेगाव वनक्षेत्रात वनविभागाचा मनमानी कारभार...


गुंडेगाव :
गुंडेगाव येथील वनग्राम समितीला पाठीशी घालत वन विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आसून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

   गुंडेगाव येथे वनग्राम समिती मार्फत मागिल दोन वर्षे पुर्वी 15 माती  बंधारे बांधण्यात आले होते, सदर माती बंधारे निकृष्ठ दर्जा चे झाले आहे हे वनविभागाने निदर्शनास आणून दिले होते व सदर दुरूस्तीचे पत्र गुंडेगाव वनग्राम समितीच्या अध्यक्षांना पाठविले होते पण या पत्राची दखल आजतागायत घेतली नाही याच प्रश्नांवर आमदार बबनराव पाचपुते यांनी विधीमंडळ पंचतारांकित प्रश्न विचारून चौकशी करण्याचे आदेश दिले आसताना सुध्दा वनविभागाने काहीच कारवाई वनग्राम समितीवर केली नाही, लाखो रुपये खर्च करून 1 टी.म.सी.पाणि साठा झाला नसता ना वनविभागामार्फत नविन सहा माती  बंधारे बांधण्याचे टेंडर प्रक्रिया पुर्ण करून कामास सुरुवात केली आसून मागिल 15 माती बंधारे दुरूस्त न करता नविन बंधारे का चालू केले असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी वनविभागाला विचारला आसून कोठे तरी गुंडेगाव वनग्राम समिती ला पाठीशी घालत आहे का असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे, या प्रश्नाविषयावर संपर्क साधला आसता मंजूर झालेला निधी परत करू असे वन अधिकारी यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment