गुंडेगाव येथे आगीत किराणा दुकान व राहतं घर जळून खाक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 20, 2021

गुंडेगाव येथे आगीत किराणा दुकान व राहतं घर जळून खाक

 गुंडेगाव येथे आगीत किराणा दुकान व राहतं घर जळून खाक


नगरी दवंडी/प्रतिनिधी

गुंडेगाव ः गुंडेगाव येथे  भरवस्तीत असलेलं व्यावसायिक  उत्तम पिंपरकर यांच्या 25 वर्षेपासून असलेल्या   किराणा दुकानाला  व राहतं घराला पहाटेच्या  सुमारास अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण दुकान व घर जळून खाक झाले. ही आग शॉर्ट सर्किटने लागली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
   भरवस्तीत असलेल्या किराणा  दुकानाला  व घराला  आग लागून संपूर्ण  दुकान जळून खाक झाले. अथक  परिश्रमानंतर आग विझविण्यात युवकांना  यश आले. या घटनेत लाखोंचे नुकसान झाले असून ही आग पहाटेच्या  सुमारास शॉर्ट सर्किटने लागली असल्याची शक्यता आहे.
   या जळीत किराणाचा व घराचा गुंडेगावचे तलाठी भाऊसाहेब  गौडा  यांनी  प्राथमिक पाहणी करून पंचनामा केला असून अंदाजे रुपये   8,73,527 नुकसान झाले आहे व कोणतेही प्रकार ची  जिवीतहानी झाली नसून आमदार बबनराव पाचपुते साहेब यांनी जळीतांची विचारपूस करत माहिती घेतलीआहे.यावेळी पाहणी करण्यासाठी  गुंडेगावचे उपसंरपच संतोष भापकर, संजय कोतकर, मंगेश हराळ, संतोष सकट, संतोष कोतकर, शिवनाथ कोतकर,संदिप धावडे,  विशाल पिंपरकर, शैलैज पिपरकर,संजय भापकर याच्या समक्ष तलाठी भाऊसाहेब यांनी  पंचनामा करण्यात आला आहे व पुढील कार्यवाही साठी तहसीलदार कार्यालयाकडे पंचनामा पाठवला आहे.

No comments:

Post a Comment