गावठी काट्यातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, March 11, 2021

गावठी काट्यातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या.

 गावठी काट्यातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या.


चिंचोडी पाटील :
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील उद्धव राजेंद्र ठोंबरे (वय- 24) या युवकाने गावठी कट्ट्याने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. सकाळी रहात्या घरीच हा प्रकार घडला नातेवाईकांनी तातडीने अहमदनगर येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासठी हलविले परंतु उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालावली होती.

   घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिस स्टेशनचे इनचार्ज सहायक पोलीस निरीक्षक युवराज, पोलीस उपनिरीक्षक ऋषभ राऊत, पोलीस हेड कॉन्स्टेबल बापूसाहेब फोलाने, पोलीस कॉन्स्टेबल भास्कर बडे, पोलिस पाटील संतोष खराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.  घटना झालेल्या खोलीची तपासणी करत आत्महत्येत वापरलेले पिस्तूल, मोबाईल फोन इतर संशयास्पद कागदपत्र ताब्यात घेतले. दरम्यान नगर तालुका पोलीस ठाण्यात प्राथमिक स्वरूपात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here