फोर्ब्सकडून उद्योगपती नरेंद्रजी फिरोदिया यांच्या कार्याची दखल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 15, 2021

फोर्ब्सकडून उद्योगपती नरेंद्रजी फिरोदिया यांच्या कार्याची दखल

 फोर्ब्सकडून उद्योगपती नरेंद्रजी फिरोदिया यांच्या कार्याची दखल


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः फोर्ब्स या अत्यंत प्रतिष्ठित नियतकालिकाने दखल घेणे, म्हणजे सार्वजनिक क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य केल्याची पावती मानली जाते. आय लव्ह नगर फौंडेशनचे संस्थापक नरेंद्रजी फिरोदिया यांचे अहमदनगरच्या उद्योग-व्यवसाय क्षेत्राच्या विकासात तसेच सामाजिक- सांस्कृतिक क्षेत्रात मोठे  योगदान आहे. त्याबद्दल ’फोर्ब्स इंडिया’ या नामांकित डिजिटल मॅगझिनच्या ’आयकॉन्स ऑफ एक्सिलन्स’ अर्थात उत्कृष्टतेचे मानचिन्ह म्हणून नरेंद्रजी फिरोदिया यांचा गौरव करण्यात आला आहे. ’फोर्ब्स’च्या विशेष अंकात फिरोदिया यांच्या कार्याचा आढावा विस्तृत लेखातून मांडण्यात आला आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करून देशाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देणार्‍या निवडक आठ व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे. कर्मभूमी अहमदनगरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी चौफेर प्रयत्न करणार्‍या नरेंद्रजी फिरोदिया यांची ’फोर्ब्स’ने विशेष दखल घेतल्याने नगरकरांची मान उंचावली आहे. फिरोदिया यांनी आपल्या वडिलांचा व्यापक समाजकार्याचा वसा शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून पुढे चालू ठेवला आहे.  
फिरोदिया यांच्या संकल्पनेतून साकारलेले आय लव्ह नगर अँप नगरकरांसाठी हक्काचे डिजिटल व्यासपीठ आहे. अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांविषयी माहिती देण्यापासून सामाजिक प्रश्नांविषयी जनजागृती करणे, तसेच विविध सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम राबवण्याचे काम आय लाव नगरच्या माध्यमातून सातत्याने सुरु असते. कोरोना संकटाच्या काळात सर्वसामान्य नगरकर हवालदिल झालेले असताना, आवश्यक ते सर्व मदतकार्य फिरोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली आय लव नगरच्या माध्यमातून करण्यात आले. गरजू कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप,  कोविड केअर सेंटरची उभारणी, ऊसतोड कामगार दाम्पत्याच्या भाजल्याने गंभीर जखमी झालेल्या लहानग्या मुलाला उपचार मिळवून देणे, टाळेबंदीमुळे अडकलेल्या दुखापतग्रस्त मुलगा व त्याच्या आईला नगरमध्ये येण्यास साहाय्य करणे, यासह अनेक गरजवंतांना मदतीचा हात देण्याचे काम फिरोदिया यांनी केले.
प्रादेशिक भाषांमधील डिजिटल मॅगझिनची सुरुवातही नरेंद्रजी फिरोदिया यांनी केली. लेट्स अप या डिजिटल मॅगझिन अँपचे मोठ्या संख्येने वापरकर्ते आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजीसह बंगाली, तमिळ, भोजपुरी या भाषांमध्ये लेट्सअप अँप सुरु असून लवकरच  गुजराती, आसामी, डोगरी भाषिकांसाठी  माहिती मनोरंजनाचा खजिना खुला होईल. यासोबत लेट्सफ्लिक्स हा ओटीटी प्लॅटफॉर्म देखील दर्जेदार आशयासह उपलब्ध करण्यात आला आहे.  ’मेक इन इंडिया’, ’डिजिटल भारत’, ’व्होकल फॉर लोकल’ या देशाच्या सक्षमीकरणासाठी सरकारने केलेल्या आवाहनाला नरेंद्रजी फिरोदिया यांनी दिलेला हा प्रतिसाद आहे.’

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here