राज्य सरकारकडे विकासकामांच्या निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे : आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 15, 2021

राज्य सरकारकडे विकासकामांच्या निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे : आ. जगताप

 राज्य सरकारकडे विकासकामांच्या निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे : आ. जगताप

प्रभाग क्र. 14 मध्ये विनायकनगर परिसरातील रस्ता काँक्रिटीकरणाचे उद्घाटन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहर विकासासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून मोठा निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे. कोरोना संकटाच्या काळामध्ये राज्यसरकारवर आर्थिक संकट असतांना सुद्धा शहर विकासासाठी निधी प्राप्त झाला आहे. या पुढील काळातही निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरूच राहिल. विकास कामाची गती वाढविण्यासाठी निधीची गरज आवश्यकता आहे. नगर शहराला जोडणार्‍या डिपी रस्त्यांचा विकास होणे गरजेचे आहे. यादृष्टीकोनातून नियोजन करून काम करत आहे. असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
प्रभाग क्र. 14 मध्ये विनायकनगर परिसरातील रस्ता काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी नगरसेवक गणेश भोसले, माजी नगरसेवक संजय चोपडा, अ‍ॅड. सुधीर बाफना, किशोर श्रीश्रीमाळ, अर्जुन लोंढे, शंकर वाघमारे, अमित आनेंचा, अ‍ॅड. अनिरूद्ध ताक, आनंद मुथा, राजेश राठी, बन्सी फुलडाहळे, ओम भगत, विजय होसिंग, गुरूधर्माधिकारी, शान बाग, शोभा भगत, अभय मुंथा, प्रणिती होसिंग, निता गांधी, मंदाबाई लोंढे, निता बाफना, संगिता मुंथा, संगिता श्रीश्रीमाळ आदी उपस्थित होते. नगरसेवक गणेश भोसले म्हणाले की, प्रभाग क्र. 14 मधील नियोजनबद्ध विकासकामांमुळे पुन्हा पुन्हा कामे करण्याची गरज पडत नाही. जमिनी अंतर्गत सर्वकामे मार्गी लागली असून, रस्त्याची कामे हाती घेतली आहेत. आ. संग्राम जगताप व महापालिकेच्या विशेष निधीतून प्रभागामधील विकासकामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. विकासकामांबरोबरच प्रभागातील नागरिकांच्या सहकार्यातूनच सामाजिक उपक्रम म्हणून प्रत्येक वर्षी झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचे काम केले जाते. त्यामुळे प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाल्याने प्रभाग हरित झाला आहे, असे ते म्हणाले. यावेळी बोलताना किशोर श्रीश्रीमाळ म्हणाले की, आमच्या कॉलनीतील सर्व प्रश्न मार्गी लागले आहेत. त्याबद्दल मी सर्व नागरिकांच्यावतीने आ. जगताप व यांच्यासह सर्व नगरसेवकांचे मनापासून आभार मानतो.

No comments:

Post a Comment