आ. रोहित पवार यांच्या पाठपुराव्यास यश ग्रामीण रुग्णालय१०० खाटांचे होऊन तेथे उपजिल्हा रुग्णालयाच्या सुविधा मिळणार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 31, 2021

आ. रोहित पवार यांच्या पाठपुराव्यास यश ग्रामीण रुग्णालय१०० खाटांचे होऊन तेथे उपजिल्हा रुग्णालयाच्या सुविधा मिळणार

 आ. रोहित पवार यांच्या पाठपुराव्यास यश 

ग्रामीण रुग्णालय१०० खाटांचे  होऊन  तेथे उपजिल्हा रुग्णालयाच्या सुविधा मिळणार



नगरी दवंडी


जामखेड - अलिकडील काळातील वाढती लोकसंख्या पहता जामखेड ग्रामीण रुग्णालय आरोग्य सुविधा पुरविण्यात अपूरे पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच तालुक्यातील जनता व लोकप्रतिनिधीच्या मागणी नुसार पाठपुरावा करत आ. रोहित पवार यांनी विशेष बाब म्हणून जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे  उपजिल्हा

रूग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात यश मिळविले आहे. आता हे रुग्णालय ३० खाटांनरून १०० खाटांचे होणार असून येथे जिल्हा रूग्णालयात देणात येणाऱ्या सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय दि. ३१ मार्च रोजी अवर सचिव रो. दि. कदम पाटील यांच्या सहीने काढण्यात आला आहे.

 या निर्णयानुसार म्हटल्याप्रमाणे जामखेड हे जिल्हा रुग्णालया पासून जास्त लांब अंतरावर असल्याने त्या ठिकाणी आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा पुरविण्यास अडचणी येत आहेत. तसेच वाढती लोकसंख्या व लोकप्रतिनिधीची सततची मागणी त्यामुळे आरोग्य संचलनालयाचे आयुक्त यांच्या ३ मार्च २०२१ च्या पत्रानुसार जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे जिल्हा उपरूग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात येत आहे. त्यानुसार सद्याच्या ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात येत असून विहित पध्दतीने जागा अधिग्रहीत करण्यात येऊन नियमानुसार पदभरती करण्याची स्वतंत्र कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीचा शासन निर्णय काढण्यात आला आहे.

तीन जिल्ह्याच्या सीमेवर असणारे व मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून जामखेडची ओळख आहे. येथील व्यापारी पेठ व बाजारपेठ मोठी असल्याने तीन जिल्ह्य़ातील लोकांचा मोठ्या प्रमाणावर वावर जामखेड शहरात असतो  अपघाताचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय असावे अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. आमदार रोहित पवार यांनी यात लक्ष घातले व उपजिल्हा रुग्णालयास मान्यता मिळवली आहे. यामुळे परिसरातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment