छावा संघटनेच्या दक्षिण जिल्हा सचिवपदी गणेश गायकवाड यांची नियुक्ती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 17, 2021

छावा संघटनेच्या दक्षिण जिल्हा सचिवपदी गणेश गायकवाड यांची नियुक्ती

 छावा संघटनेच्या दक्षिण जिल्हा सचिवपदी गणेश गायकवाड यांची नियुक्ती

गायकवाड व सरपंच शुभांगी शिकारे यांचा सत्कार


गरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अखिल भारतीय छावा संघटनेच्या अहमदनगर दक्षिण जिल्हा सचिवपदी सामाजिक कार्यकर्ते गणेश गायकवाड यांची नियुक्ती झाल्याबद्दल छावाच्या महिला जिल्हाध्यक्षा सुरेखाताई सांगळे यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच धनगरवाडी (ता. नगर) ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शुभांगीताई शिकारे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष नितिन पटारे, जिल्हा संपर्क प्रमुख किशोर शिकारे, महेश चव्हाण, आकाश गीते, विठ्ठल आढाव, उत्तम शिकारे, बाळासाहेब आढाव, अशोक विटकर, बाळासाहेब शिकारे, लक्ष्मण शिकारे, भैय्या विधाते, नितीन पोटे, उमेश कवडे, प्रशांत गायकवाड आदी उपस्थित होते.
सुरेखाताई सांगळे म्हणाले की, वंचित, दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी छावा संघटना नेहमीच प्रयत्नशील आहे. अनेक सामाजिक विषय हाताळत असताना छावा संघटना वंचितांचा आधार बनून कार्य करीत आहे. संघटनेचे पदाधिकारी शिकारे यांच्या पत्नीची धनगरवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी नियुक्ती झाली असून, सामाजिक भावनेने ते ग्रामपंचायतीचे कार्य करणार आहे. तर सामाजिक कार्यकर्ते गणेश गायकवाड यांच्या कार्यादी दखल घेऊन त्यांना कार्य करण्याची संधी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here