चंदन चोर गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 22, 2021

चंदन चोर गजाआड.

 चंदन चोर गजाआड.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः श्रीरामपूर-नेवासा रोड वरून हुंडाई कंपनीच्या काळ्या रंगाचे कारमधून जात असल्याची माहिती प्राप्त झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने नगर-औरंगाबाद रोड वरील घोडेगाव येथे सापळा लावून 16 किलो वजनाची चंदन (किंमत 48,000) व हुंडाई कंपनीची कार (किंमत 3,48,000) जप्त करून सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
30 डिसेंबर 2020 ला कोपरगाव मधील कोल्हे वाडी येथुन 15,000 रु. किंमतीचे चंदनाचे झाड चोरी गेल्याची फिर्याद घनश्याम पोपट नेटके वय 32 वर्ष रा.खिर्डी गणेश यांनी कोपरगाव पोलीस स्टेशनला नोंदविली होती. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अहमदनगर शहर व जिल्ह्यामध्ये चंदन चोरीच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे पोलीस अधीक्षक यांचे आदेशावरून अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा, यांनी चंदन चोरीचे गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमले होते. त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार चंदन चोरी करणार्‍या आरोपीची माहिती घेत असताना कटके यांना माहिती मिळाली की, काही इसम हे हुंडाई कंपनीच्या काळ्या रंगाच्या कार मधून चंदनाची लाकडे घेऊन श्रीरामपूर-नेवासा रोडने चांदा गावच्या दिशेने जात आहेत. त्यावेळी गणेश इंगळे, दत्ता हिंगडे, सुनील चव्हाण, बबन मखरे, संदीप पवार, सुरेश माळी, जालिंदर माने, सागर ससाने, चंदू कळस्कर व दोन पंचाना मिळून तात्काळ नगर-औरंगाबाद रोड वरील शनिशिंगणापूर चौकात सापळा लावला. त्यानंतर काही वेळातच नेवासा फाटा दिशेकडून काळे रंगाची कार येत असल्याचे दिसल्याने अधिकारी व अंमलदार यांनी कार थांबवण्याचा इशारा करून घेराव घालून सदर कार व त्यामध्ये असलेल्या सर्वांना ताब्यात घेतले. त्यांना पोलीस स्टाफ व पंचाची ओळख सांगून त्यांची नावे पत्ते विचारली असता त्यांनी त्यांची नावे व पत्ते शितल उर्फ सीताराम उर्फ गणेश भानुदास कुर्‍हाडे, वय 32 वर्षे, रा चितळी स्टेशन, ता राहता. करण विजय कुर्‍हाडे वय 25 वर्षे, चितळी स्टेशन, ता राहता. परमेश वैश्या भोसले, वय 26 वर्षे, रा भेंडाळा, गंगापूर, जि औरंगाबाद. सतीश मच्छिंद्र शिंदे वय 32 वर्षे, चोभे कॉलनी, बोल्हेगांव अहमदनगर, संतोष मारुती शिंदे वय 32 वर्षे, रा चोबे कॉलनी बोल्हेगांव अहमदनगर, गणेश विष्णू गायकवाड वय 26 वर्षे, मोढ्यांचे मागे, गंगापूर जि औरंगाबाद असे असल्याचे सांगितले. त्यांच्या कारच्या झडती चा उद्देश समजावून सांगुन पंचांसमक्ष त्यांच्या कारची झडती घेतली असता सदर कारमध्ये 48000 रु. कि.चे अंदाजे 16 किलो वजनाची चंदनाची लाकडे मिळून आल्याने सदरची चंदनाची लाकडे तसेच 3,00,000 रु. किं.ची हुडांची कंपनीची कार नं. एम एच-14 बीएम-2010 असा एकूण 3,48,000 रु.कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
जप्त करण्यात आलेली चंदनाची लाकडे कुठून आणली आहेत व कुठे घेऊन चालले होते याबाबत आरोपींना विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता आरोपींनी ही चंदनाची लाकडे ही मागील सहा महिन्याचे कालावधीमध्ये कोल्हे वस्ती, कोपरगाव, एस्सार पेट्रोल पंप, बालिकाश्रम रोड अहमदनगर, धारणगाव, ता.कोपरगाव, या ठिकाणाहून चोरून आणलेल्या चंदनाचे झाडाची लाकडे असून चंदन बाळासाहेब हरिभाऊ गायकवाड रा.चांदा यास विक्री करण्यासाठी घेऊन जात आहे असे सांगितले.
त्यानंतर आरोपी बाळासाहेब हरिभाऊ गायकवाड यांचा चांदा येथे जाऊन शोध घेतला असता तो मिळून आला नाही. ताब्यात घेतलेल्या आरोपींना मुद्देमालासह कोपरगाव तालुका पो.स्टे येथे हजर करण्यात आले आहे पुढील तपास कोपरगाव तालुका पो.स्टे करीत आहेत या आरोपींवर अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई मनोज पाटील, पोलीस अधीक्षक अहमदनगर, सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर, संजय सातव उपविभागीय पोलिस अधिकारी, शिर्डी विभाग, विशाल ढूमे उपविभागीय पोलिस अधिकारी, नगर शहर विभाग, अहमदनगर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी केलेले आहे.

No comments:

Post a Comment