संजय भिंगारदिवेंचा भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 1, 2021

संजय भिंगारदिवेंचा भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

 संजय भिंगारदिवेंचा भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे केडगाव मंडल अध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या संजय भिंगारदिवे यांनी भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भिंगारदिवे यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे.
यावेळी काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, अनंतराव गारदे, खजिनदार मोहनराव वाखुरे, शहर जिल्हा सचिव प्रशांत वाघ, सहसचिव गणेश आपरे, प्रमोद डांगे, अरुण भिंगारदिवे यांची उपस्थिती होती.
भिंगारदिवे हे माजी खा.दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये पक्ष संघटनेच्या माध्यमातून सक्रियपणे गेल्या अनेक वर्षांपासून काम करत होते. केडगाव सारख्या महत्त्वाच्या मंडलाचे ते अध्यक्ष होते. सन 2013 च्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्यांनी बहुजन समाज पार्टीच्या तिकिटावर निवडूक देखील लढविली होती. माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे संस्थापक असणार्‍या भीमशक्ती संघटनेचे त्यांनी शहर अध्यक्ष म्हणून देखील अनेक वर्ष काम पाहिले आहे. शाहू, फुले, आंबेडकर चळवळीमध्ये ते गेल्या अनेक वर्षांपासून नगर शहरामध्ये कार्यरत आहेत. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय विकास संस्थेचे ते 2008 पासून अध्यक्ष आहे. भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राच्या युवा पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलेले आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. पक्ष प्रवेशानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना संजय भिंगारदिवे म्हणाले की, किरणभाऊ काळे हे विकासाची दृष्टी असणारे दूरदर्शी आणि निर्भीड नेतृत्व आहे. नगर शहराचा अनेक दशकांपासून प्रलंबित असणारा विकास करण्याची धमक ही त्यांच्यामध्ये आहे. माझ्यासारख्या शाहू, फुले,आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांना किरणभाऊंच्या नेतृत्वाखाली न्याय मिळेल याची खात्री पटल्यामुळेच मी काँग्रेसचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचा मला अभिमान आहे. आगामी काळामध्ये शहरातील दलित चळवळीमध्ये काम करणार्‍या अनेक कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाच्या प्रवाहा मध्ये सामील करून घेण्यासाठी आणि काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील संघटन मजबूत करण्यासाठी मी मनापासून काम करणार असल्याचे प्रतिपादन, यावेळी बोलताना भिंगारदिवे यांनी केले आहे. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले की, काँग्रेस पक्षामध्ये शाहू-फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांना नेहमीच सन्मानाची वागणूक दिली जाते. भारतीय जनता पार्टीचा फोलपणा हा आता भाजपच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येऊ लागला आहे. त्यामुळेच शहरात भाजपला गळती लागली असून काँग्रेसमध्ये इन्कमिंग सुरू झाले आहे. संजय भिंगारदिवे हे दलित चळवळीतील जाणते नेते आहेत. त्यांचा काँग्रेसमध्येच सन्मान केला जाईल. त्यांच्यामागे पक्षाची ताकद उभी केली जाईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here