अचानक टेंडर प्रक्रिया मागे घेतल्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय, स्मायलिंग अस्मिता करणार आंदोलन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 26, 2021

अचानक टेंडर प्रक्रिया मागे घेतल्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय, स्मायलिंग अस्मिता करणार आंदोलन

 अचानक टेंडर प्रक्रिया मागे घेतल्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय, स्मायलिंग अस्मिता करणार आंदोलन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः आज अहमदनगर येथील कृषी अधीक्षक  कार्यालयात  स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्यावतीने कृषी अधिक्षक शिवाजी जगताप यांच्या कार्यालयात ठाण मांडले. कारण होते अचानक कृषी विभागाचे जाहीर झालेले टेंडर पुन्हा री-टेंडर करण्यासाठी प्रक्रिया राबविल्याने बेरोजगार उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे शिवाय रीटेंडरिंगचे एकही कारणही अधिकारी देऊ शकले नाहीत त्यामुळे उपस्थितांनी अधिकार्यांसमोर संताप व्यक्त केला.हि चर्चा जवळपास तीन तास चालली. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी विषयांतर करताना दिसले. यावेळी स्मायलिंग अस्मिताचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. यासंदर्भातील माहिती आम्ही रक्ताने पत्र लिहून राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना पाठवणार आहोत. सोबतच उद्यापासून कृषी अधीक्षक कार्यालयात निवासी आंदोलन सुरू करणार आहे असेही त्यांनी सांगितले. यावेळी सचिन सापते, सामाजिक कार्यकर्ते अभिजीत दरेकर, कृष्णा कुंदुरकर आणि विद्यार्थी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment