योजनांच्या माध्यमातून सभासदांचे जीवनमान उंचविण्याचे प्रयत्न-सुदामराव बनसोडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 24, 2021

योजनांच्या माध्यमातून सभासदांचे जीवनमान उंचविण्याचे प्रयत्न-सुदामराव बनसोडे

 योजनांच्या माध्यमातून सभासदांचे जीवनमान उंचविण्याचे प्रयत्न-सुदामराव बनसोडे

छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवक पतसंस्थेची वार्षिक सभा ऑनलाईन संपन्न


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अहमदनगर जिल्ह्यात लोकशाही तत्वाने चालणारी ग्रामसेवकांची एकमेव पतसंस्था म्हणून नावलौकिक आहे. पतसंस्थेची सभासद संख्या 1112 असून, सभासदांच्या हितांचे निर्णय घेऊन जास्तीत जास्त फायदा कसा होईल, यासाठी पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी काम करत आहेत. पतसंस्थेच्यावतीने सभासदांसाठी विविध कर्ज योजना राबवून सभासदांचे जीवनमान उंचविण्याचे काम केले आहे.  कोणत्याही प्रक़ारचे आर्थिक हित न पाहता सभासदांच्या हितास प्राधान्य दिले आहे. सभासदांच्या कर्ज मर्यादेतही वाढ करण्यात आलेली असून, भागभांडवल, कायम ठेव व मुदतठेव यामुळे संस्थेचा पाया भक्कम झालेला आहे. त्यामुळेच संस्थेने सांस्कृतिक भवन उभारणी कामी 17 गुंठे जागा खरेदी केली आहे. संस्थेस स्थापनेपासून असणारा ऑडिट वर्ग ‘अ’ कायम ठेवला आहे, अशी माहिती छत्रपती शिवाजी राजे ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सुदामराव बनसोडे यांनी दिली.
छत्रपती शिवाजी राजे ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला. याप्रसंगी चेअरमन सुदामराव बनसोडे, व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर सुर्वे, मानद सचिव चंद्रकांत तापकिर, संचालक सुरेश मंडलिक, प्रमोद कानडे, दादासाहेब शेळके, सुरेश खरड, प्रशांत सातपुते, किशोर जेजुरकर, राजेंद्र बागले आदि उपस्थित होते.
याप्रसंगी व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर सुर्वे म्हणाले, संस्थेस आयएसओ मानांकन प्राप्त असून, मोबाईल सेवा,  सभासदांचा अपघात विमा, मयत सभादांच्या कुटूंबियांना मदतीचा आधार व विमा संरक्षण, विवाहभेट योजना अशा विविध योजनांद्वारे सभसदांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच सभासदांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत, गुणवंतांचा सत्कार करुन एक कौटुंबिक नाते निर्माण केले आहे. संस्थेचे पदाधिकारी  संस्थेसाठी कार्यरत असल्यामुळे पतसंस्था आज प्रगतीपथावर आहे. पतसंस्थेच्या कार्यात सर्वांनी सक्रीय सहभाग देऊन प्रगती करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी मानद सचिव चंद्रकांत तापकिर यांनी कोरोना काळातही संस्थेने केलेल्या उल्लेखनिय कामगिरीचे कौतुक करुन संस्थेच्यावतीने आर्थिक वर्षभरात केलेल्या कामाचा ताळेबंद सादर केला. यापुढेही संस्था सभासदांचे हित जोपासत प्रगतीपथावर राहिल, असा विश्वास व्यक्त केला.
या ऑनलाईन सभेत सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना संचालक मंडळाने समर्पक उत्तरे देऊन समाधान केले. सभेस संचालक रामदास जाधव, जयराम ठुबे, दादासाहेब डौले, संजय गवळी, अरुण गाढवे, संजय गिर्हे, बाळासाहेब मेहेत्रे, सुनिता बर्वे, अर्चना कडू, अशोक जगदाळे, सेक्रेटरी पवनकुमार घिगे, सुरेश निनावे आदि सहभागी झाले होते. शेवटी व्यवस्थापक राजेंद्र शेडाळे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment