श्रमिकनगर येथे लवकरच आरोग्यकेंद्र उभारणार ः महापौर वाकळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 17, 2021

श्रमिकनगर येथे लवकरच आरोग्यकेंद्र उभारणार ः महापौर वाकळे

 श्रमिकनगर येथे लवकरच आरोग्यकेंद्र उभारणार ः महापौर वाकळे

‘मनोज दुलम हे सामाजिक बांधिलकी जोपासणारे नगरसेवक’


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः सभागृह नेते मा.श्री.मनोज दुलम हे विकास कामा बरोबर सामाजिक बांधिलकी जोपासणारे नगरसेवक आहेत. त्यांनी वर्षभर कोरोना संसर्गाच्या काळामध्ये कोवीड रूग्णांना आपल्या जिवाची पर्वा न करता त्यांच्यावर उपचारासाठी प्रयत्नशील राहिले. त्याच बरोबर  रूग्णांना  आधार देण्याचे काम त्यांनी केले. नातेवाईक पेन्शट जवळ जात नव्हते पण मा्.श्री.मनोज दुलम यांनी अहोरात्र सेवा दिली. त्यांच्या प्रयत्नातूनच लवकर श्रमिक नगर मध्ये आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे.  त्याच बरोबर बालाजी मंदिर हे भाविकांचे श्रध्दास्थान आहे. या मंदिर परिसराचा विकास व्हावा यासाठी सुमारे 40 लाख रूपयाचा निधी मंजूर असून लवकरच हे कामही सुरू होणार असल्याचे प्रतिपादन महापौर मा.श्री.बाबासाहेब वाकळे यांनी केले.
सभागृह नेते मा.श्री.मनोज दुलम  यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्र. 5 मध्ये श्रमिक नगर येथे रस्ता कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांच्या शुभहस्ते झाले यावेळी सभागृह नेते मा.श्री.मनोज दुलम, नगरसेवक मा.श्री.महेंद्रभैय्या गंधे, माजी नगरसेवक मा.श्री.तायगा शिंदे, सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.उदय कराळे, सावेडी भाजप मंडल अध्यक्ष मा.श्री.सतिष शिंदे, मा.श्री.शिवराम श्रीगादी, मा.श्री.जा  लिं दर गुरप ,मा.श्री.राजू येमूल, मा.श्री.आसाराम मोकाटे, प्रिती दळवी, निलीमा दुर्गम, वनमाला टोलपे, राधाबाई गादी, वैशाली कटकम, मंदाबाई गायकवाड, भाग्यलक्ष्मी गड्डम, आदी उपस्थित होते.
भाजपा शहरजिल्हाध्यक्ष मा.श्री.महेंद्रभैय्या गंधे म्हणाले की, श्रमिक नगर मधील जनता नेहमीच भाजपा पक्षाबरोबर प्रामाणिकपणे राहिली आहे. या भागाचा विकास व्हावा यासाठी मा.श्री.मनोज दुलम नेहमीच प्रयत्नशील असतात. यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे.  श्रमिक नगर मधील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही चारही नगरसेवक कटीबध्द आहोत असे ते म्हणाले.
सभागृह नेते मा.श्री.मनोज दुलम म्हणाले की, श्रमिक नगर मध्ये आरोग्य केंद्र उभारावे यासाठी पाठपुरावा असून लवकर हे काम मंजूर होईल त्यामुळे या परिसरातील सर्व सामान्य नागरिकांना अल्प दरात रूग्ण सेवा मिळेल. बालाजी मंदिर परिसराच्या विकासासाठी राज्य सरकारकडून 40 लाख रूपयाचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामधून विविध विकास कामे केली जाणार आहे. प्रभागातील मुलभूत प्रश्नांबरोबरच विकासाचे प्रश्न मार्गी लागत असून कुष्ठधाम रोडचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. सावेडी उपनगराला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याच्या विकास कामामुळे शहराच्या वैभवात नक्कीच भर पडेल असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here