तुम्हाला हे पाप फेडावं लागेल- मुनगंटीवार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 3, 2021

तुम्हाला हे पाप फेडावं लागेल- मुनगंटीवार.

 तुम्हाला हे पाप फेडावं लागेल- मुनगंटीवार.

जळगाव वसतिगृहातील धक्कादायक प्रकार उघड...


मुंबई-
 ‘अतिशय गंभीर विषय सभागृहात उपस्थित केला आहे. अशा पद्धतीने तुमच्या माझ्या आई-बहिणाला नग्न करून नाचालया लावलं जातंय. त्याची फक्त आम्ही नोंद घेऊ का? इथे मृत मनाचे आमदार, मंत्री आहेत. पण आमचं मन जिवंत आहे. अशा घटनेमुळे तळ पायाची आग मस्तकात गेली पाहिजे. एक तासात चौकशी करतो. काय कारवाई करणार आहे, तो अहवाल आम्ही देतो, असं आम्हाला उत्तरामध्ये सांगितलं पाहिजे. फक्त नोंद घेतो नाही. तुम्हाला हे पाप फेडावं लागेल.’असा घणाघात भाजपानेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज केला.
पुढे मुनगंटीवार म्हणाले की, ‘आताची घटना असून पोलिसांकडे याबाबत माहिती असूनही आता जाऊन चौकशी करायची नाही आहे? 15 हजार कोटी खर्च केल्यानंतर पोलीस यंत्रणा जर माहितीच घेतं नसेल तर कशासाठी सरकार? राष्ट्रपती राजवट लावावी लागेल. या सरकारवर राष्ट्रपती राजवट आणायची वेळ आली आहे. मी संविधानाचा सन्मान करणारा व्यक्ती आहे. पण तुम्ही 101 पाप केली त्यामुळे आता राष्ट्रपती राजवट शिवाय पर्याय नाही. आमच्या आई-बहिणीची थट्टा केली जात असेल तर राष्ट्रपती राजवट हा एकच मार्ग आहे.’
जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही पोलीस कर्मचार्‍यांनी आणि वसतीगृहाबाहेरील पुरुष मंडळी वसतिगृहातील तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याचा व्हिडिओ जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला आहे. याचप्रकरणावर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसर्‍या दिवशी खडाजंग पाहायला मिळाली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here