मुकुंदनगरमध्ये राजनगर येथे अन्सारी मेडिकलचे उद्घाटन संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 24, 2021

मुकुंदनगरमध्ये राजनगर येथे अन्सारी मेडिकलचे उद्घाटन संपन्न

 मुकुंदनगरमध्ये राजनगर येथे अन्सारी मेडिकलचे उद्घाटन संपन्न


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः आज जे मेडीकल मी सुरू केले आहे त्यामागे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांचे प्रयत्न आहेत मला मेडीकल सुरू करण्याकरीता महानगरपालिकेची ना हरकत दाखला पाहीजे होता तो बोराटे यांच्यामुळेच (छजउ) मिळाला. सतत दुसर्‍याला मदत करण्याकरीता बोराटे हे प्रयत्नशील असतात. बोराटे हे सातत्याने समाजातील गोरगरीबांचे दु:ख कमी कसे होईल याकडे लक्ष देत असतात. असे प्रतिपादन अन्सारी मेडिकलचे इरफान अन्सारी यांनी केले.
मुकुंदनगरमध्ये राज नगर येथे अन्सारी मेडिकलचे उदघाटन नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  नगरसेवक आसीफ सुलतान, नगरसेवक बाबा खान,आर्किटेक्ट अर्शद शेख,सय्यद अवेज,फहीम खान,आसीफ पटवेकर,अन्सारी नथुनी गफार, अन्सारी मेडीकलचे  अन्सारी इरफान नथुनी, अन्सारी इरशाद नथुनी,काजल सतीष कांबळे,तारीक कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
नगरसेवक बाळासाहेब बोराटे म्हणाले की सातत्याने समाजातील गोरगरीबाची सेवा आपल्या माध्यमातून कसे घडेल हे पाहत असतो इरफानच्या आईवडीलांनी घेतलेले कष्ट व त्याला इरफानने दिलेली साथ महत्वाची असुन अत्यंत हलाखीच्या परीस्थितीत इरफानने हे केले आहे हे समाजासाठी प्रेरणादायी व कौतुकास्पद  आहे.
नगरसेवक आसीफ सुलतान,आकिटेक्ट अशद शेख यांनी मनोगत व्यक्त करत इरफानच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here