मागासवर्गीय कुटुंबीयास डांबून ठेवणार्‍या वीटभट्टी मालकावर कारवाई करण्याची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 26, 2021

मागासवर्गीय कुटुंबीयास डांबून ठेवणार्‍या वीटभट्टी मालकावर कारवाई करण्याची मागणी

 मागासवर्गीय कुटुंबीयास डांबून ठेवणार्‍या वीटभट्टी मालकावर कारवाई करण्याची मागणी

वैरागर कुटुंबीयांच्या वतीने पोलीस अधिक्षक कार्यालयात निवेदन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अनाधिकृत वीटभट्टी चालवणार्या गुंड प्रवृत्तीच्या मालकाने मागासवर्गी वीटभट्टी मजूर कुटुंबीयांना डांबून ठेऊन त्यांच्यावर अन्याय, अत्याचार सुरु केला असल्याचा आरोप करुन सदर वीटभट्टी मालकावर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी तक्रारदार काकासाहेब वैरागर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी संविधान नायक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास वैरागर, रामदास क्षीरसागर, बाबासाहेब वैरागर, सोमनाथ ओहळ, सुरेश शिरसाठ आदी उपस्थित होते.  
चिचपूर (ता.पाथर्डी) येथे बाळासाहेब दहिफळे व ईश्वर दहिफळे अनाधिकृतपणे वीटभट्टी चालवित आहे. तेथे  काकासाहेब वैरागर व त्यांचे कुटुंबीय (रा. ब्राह्मणी, ता. राहुरी) पंधरा वर्षापासून वीटभट्टी मजूर म्हणून काम करत आहे. दहिफळे यांनी वीटभट्टी मजूर असलेल्या वैरागर कुटुंबीयांना डांबून ठेवले आहे. वैरागर कुटुंबीयांच्या सदस्यांवर अन्याय, अत्याचार सुरु असून, त्यांच्या लहान मुलांना अवजड काम करण्यास भाग पाडले जात आहे. महिलांशी देखील असभ्यपणे वागत असून, त्यांची छेड काढली जात आहे. सांगितलेली कामे न केल्यास मारहाण केली जात आहे. कामगारांना पैसे देऊन खरेदी केले असल्याचे सांगून, या ठिकाणाहून बाहेर पडण्यास मज्जाव केला जात आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलीस स्टेशनला तक्रार देऊन देखील पोलीसांनी संबंधीत अनाधिकृत वीटभट्टी चालवणार्या मालकावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप तक्रारदार काकासाहेब वैरागर यांनी केली आहे. अनाधिकृत वीटभट्टी चालवणार्या गुंड प्रवृत्तीच्या मालकाने मागासवर्गी वीटभट्टी मजूर कुटुंबीयांना डांबून ठेऊन त्यांच्यावर अन्याय, अत्याचार केल्याप्रकरणी दहिफळे पिता-पुत्रांवर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याची मागणी वैरागर कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आली आहे. सदर प्रकरणी न्याय न मिळाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment