कासारे येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 2, 2021

कासारे येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

 कासारे येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न


नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः पारनेर तालुक्यातील कासारे येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती मा. काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 

यामध्ये कासारे ते गारगुंडी रस्ता लोकार्पण करणे रु. 15 लक्ष, कासारे ते वागदरा रस्ता सुधारणे रु. 5 लक्ष श्री खंडोबा देवस्थान कासारे येथे सभामंडप करणे रु. 3 लक्ष अशा कामांचा समावेश आहे. पंचायत समिती पारनेर मार्फत आरो फिल्टर प्लांट बसवणे या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. 

यावेळी बोलताना जिल्हा परिषद सभापती म्हणाले मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून कासारे गावात कामाला सुरुवात केलेली आहे कासार येथे गारगुंडी रस्ता मजबुतीकरण करणे हा दोन टप्प्यात रुपये 30 लक्ष निधी टाकून कासारे शिवारा पर्यंत पूर्ण केला भविष्यात राहिलेला रस्ताही पूर्ण करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. कासारे ते वाघदरा या रस्त्यावर पाच लक्ष निधी टाकून त्यांचे मोरी बांधकाम करून घेऊ व नंतर मुरमीकरण करू असे त्यांनी सांगितले. तसेच खंडोबा मंदिरासाठी सभामंडप करणे करिता तीन लाख निधी रुपये उपलब्ध केला आहे तसेच तीर्थक्षेत्र विकास करणे अंतर्गत श्री बिरोबा देवस्थान ट्रस्ट करता परिसरामध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवण्यासाठी 30 लाख निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सभापती काशिनाथ दाते सर यांनी दिले एवढा भरघोस निधी कासारे गावा करतात देण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिल्याने ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले. यावेळी नवनिर्वाचित सरपंच ,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे अभिनंदन त्यांनी केले माझ्या चाळीस वर्षाच्या राजकारणात मी सत्येच्या बाजूने राहून तालुक्यात अनेक विकासकामे मार्गी लावले यामध्ये माजी आमदार वसंत दादा पाटील असतील, मा.आ. बाबासाहेब ठुबे असतील व अलीकडे मागच्या पंधरा वर्षापासून नामदार विजयराव औटी साहेब असतील यांच्याबरोबर काम करून विकासाची कामे मार्गी लावली चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या सत्तेचा उपयोग करून घेतला त्यामुळे यापुढेही मी काम करण्याचा प्रयत्न करत राहणार असेही त्यांनी सांगितले. 

यावेळी पंचायत समितीचे सभापती गणेशराव शेळके यांनी मनोगत व्यक्त करताना तालुक्यात दोन्ही महत्त्वाच्या सत्ता आपल्याकडे असल्याने विकास काम करण्याकरता मी आणि सभापती दाते सर दुसर्‍याच्या दारात जाऊ देणार नाही असे सांगितले तसेच पंचायत समिती मार्फत असणारे योजना तळागाळापर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले ह्या आरो प्लांट मध्ये एक तासाला पाचशे लिटर शुद्ध आणि थंड पाणी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी सरपंच शिवाजी निमसे, उपसरपंच शैला घनवट, ग्रामपंचायत सदस्य भाऊ खरात, कमल दातीर , माजी सरपंच शंकरराव घनवट, बिरोबा देवस्थान चे अध्यक्ष लघु शेठ खरात, उपाध्यक्ष मांजराम दातीर, विश्वस्त नरड सर ,संतोष घनवट, गोवर्धन खरात ,वसंत दातीर, धनंजय निमसे ,गोकुळ निमसे, शिंदे गुरुजी, ग्रामसेवक डेरे मॅडम, नंदा खरात, अजित निमसे ,बापू दातीर ,पीएसआय बाळासाहेब दातीर ,संपत पानमंदसर,  पिंपळगाव रोठा चे बाबासाहेब जगताप, युवा नेते गोपीनाथ घुले, तिखोलचे मा. सरपंच सुभाष ठाणगे सर ,गारगुंडी ग्रामपंचायत सदस्य तुकाराम फापाळे ,कामाचे ठेकेदार फारुख सय्यद, बबनराव वाळुंज आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंतराव दातीर यांनी केले तर सर्वांचे आभार भाऊ शेठ खरात यांनी मानले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here