चाईल्ड लाईन-लोणी पोलिसांनी रोखला बालविवाह - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 17, 2021

चाईल्ड लाईन-लोणी पोलिसांनी रोखला बालविवाह

 चाईल्ड लाईन-लोणी पोलिसांनी रोखला बालविवाह


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः लग्नासाठी मुलीचे वय 18 वर्षे व मुलाचे वय 21 वर्षाचा वर असणे कायद्याने बंधनकारक आहे लहान वयात मुलीचे लग्न केले तर भविष्यात तीला अनेक शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते त्यामुळे वयात आल्यानंतर लग्न करणे हे आवश्यक असते परंतु आजही काही जण मुलीचा विवाह लहान वयात करून आपली जबाबदारी पार पाडल्याचे समजत आहे. असाच होणारा एक  बालविवाह लोणी पोलीस आणि चाईल्ड लाईन अहमदनगर यांनी काल रोखला.
यावेळी मुलीचा पालकांची आणि उपस्थितांचे समुपदेशन करण्यात आले. त्यांना बालविवाह कायद्याची समज देण्यात आले. 15 मार्च 2021 रोजी अहमदनगर येथील चाईल्ड लाईन  यांच्या 1098 या टोल फ्री क्रमांकावर 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह  होणार असल्याची माहिती मिळाली.  ही माहिती मिळताच ताबडतोब लोणी पोलीस स्टेशन येथील सहाय्यक  पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांना देण्यात आली.  त्याचबरोबर बाल कल्याण समिती अहमदनगर , जिल्हा बाल संरक्षण कक्ष , बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आले .  समाधान पाटील सर यांनी ताबडतोब कार्यवाही करीत लोणी पोलिस स्टेशनचे चे पोलीस नाईक लमधाडे आणि इतर पोलीस कर्मचारी  यांना बालविवाह  घटनास्थळी ताबडतोब रवाना होण्यास आदेश दिले . ही टीम तिथे जाऊन प्रथम शहानिशा करण्यात करून तो बालविवाह आहे का याची खात्री केली.
तिथे उपस्थित मुला- मुलीचे पालक यांनी माहिती दिली की आमचा लग्नाचा कार्यक्रम नसून जमवा जमविचा कार्यक्रम आहे , आम्ही फक्त लग्नाची सुपारी फोडणार आहोत. पण पोलिसांनी खूप विचार पूस केल्यानंतर सर्व गोष्टी समोर आल्या . मग समजले की , मुलगी ही अहमदनगर तालुक्यातील जेऊर येथील आहे . मुलीला उचलून आणून मुलाच्या राहत्या घरीच लग्न लावण्याचे ठरले होते . हे समजल्यावर पोलिसांनी तबडतोप  सदर उपस्थित असलेल्या सर्वांना लेखी आणि तोंडी स्वरूपात समज देण्यात आली मुलीच्या पालकांकडून आणि मुलाचा पालकांकडून लेखी स्वरुपात जबाब  घेण्यात आले की सदर अल्पवयीन मुलीचे अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत तिचे लग्न लावणार नाही जर लग्न अठरा वर्षाचा आत लावलेस  बाल विवाह प्रतिबंधक कायदा 2006 नुसार आम्ही शिक्षेस पात्र आहोत . याप्रकारे जबाब घेऊन त्यांना लोणी पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले .
सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील सरांनी मार्गदर्शन करून त्यांना कायदेशीर रित्या नोटीस बजावून मुलीच्या पालकांना आणि मुलाचा पालकांना बाल कल्याण समिती अहमदनगर या ठिकाणी हजर राहणे अनिर्वार्य आहे. मुळे पाटील सर यांनी मुला- मुलीचा पालकांना नोटीस बजावली की, दि. 17 मार्च 2021 रोजी   कल्याण समिती अहमदनगर या ठिकाणी हजर राहणे अनिर्वार्य आहे. जर हजर  होऊ न शकल्यास कायदेशीर रित्या कार्यवाही केली जाईल . हा बालविवाह थांबवण्या साठी चाईल्ड लाईन अहमदनगर आणि लोणी पोलीस यांनी खूप परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here