आ.रोहितदादा पवार विचार मंचाच्या वतीने खर्डा येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, March 2, 2021

आ.रोहितदादा पवार विचार मंचाच्या वतीने खर्डा येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

 आ.रोहितदादा पवार विचार मंचाच्या वतीने खर्डा येथे स्वच्छता अभियान  राबविण्यात आले.  

  


नगरी दवंडी

जामखेड  - आ.रोहितदादा पवार विचार मंचाच्या वतीने खर्डा येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.                          याबाबत सविस्तर माहिती अशी की सौ.सुनंदाताई पवार यांच्या संकल्पनेतून खर्डा येथे आ.रोहितदादा पवार विचार मंचाची स्थापना नुकतीच करण्यात आली आहे मंचाचे अध्यक्ष दत्तराज पवार यांनी यामध्ये पुढाकार घेऊन स्वच्छते विषयी जनजागृती करून काही निवडक सहकार्‍यांना सोबत घेऊन खर्डा शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा संकल्प केला आहे तसेच आठवड्यातुन दोन दिवस प्रत्येक गल्लीत हे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असल्याचे सांगितले, प्रथमता खर्डा येथील सिताराम बाबांचा गड व देवीचे मंदिर स्वच्छ करण्यात आले, अंगारकी चतुर्थीच्या माध्यमातून मेन रोड खर्डा येथील श्रद्धा गणेश मंडळ परिसर तसेच सुतार नेट येथील मयूरेश्वर गणेश मंडळचा परिसर स्वच्छ करण्यात आला असा हा स्वच्छतेचा प्रयोग खर्डा शहरात प्रथमच होत असल्याने हे स्वच्छता अभियान राबवित असताना काही ग्रामस्थ या स्वच्छता अभियानात सहभागी झाले हा सर्व परिसर स्वच्छ व चकचकीत केल्याने अनेक ग्रामस्थांनी अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले या स्वच्छतेच्या मोहिमेसाठी माजी ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब ढगे, विकास शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सौ. सुनिता जावळे, महालिंग कोरे,भीमराव घोडेराव,गुरुराज पवार, दीपक जावळे,अवि सुरवसे, सौ.नीताताई पवार, इत्यादींनी स्वच्छता अभियानात सहभाग घेऊन हे स्वच्छता अभियान यशस्वीपणे पार पाडले. हे स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्या बद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here