मैं हूँ डॉन! तडीपार गुन्हेगारांची दहशत! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 22, 2021

मैं हूँ डॉन! तडीपार गुन्हेगारांची दहशत!

 मैं हूँ डॉन! तडीपार गुन्हेगारांची दहशत!

बालिकाश्रम रोड, निलक्रांती चौकात धुमाकूळ घालणार्‍या विजय पठारेवर दरोड्याचा गुन्हा दाखल


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मैं हूँ डॉन.. म्हणून धमकावून हप्त्याची मागणी करणार्‍या तडीपार विजय पठारेवर व त्याचे साथीदारांवर बालिकाश्रम रोड व निलक्रांती चौकात धुमाकूळ घालत दहशत माजवून दुकानातील कामगारांना मारहाण करीत बळजबरीने पैसे वसूल केल्या प्रकरणी  दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अक्षय राजेंद्र जाधव वय 26, जाधव मळा बालिकाश्रम रोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये विजय राजू पठारे, अजय राजू पठारे, सुरज साठे, राहुल झेंडे, अक्षय (पूर्ण नाव माहित नाही) व मयुर चावरे (सर्व रा. सिद्धार्थ नगर, नगर) यांचा समावेश आहे. आरोपींनी बालिकाश्रम रोड वरील कापड दुकान तसेच निलक्रांती चौकातील सायकल मार्टच्या दुकानात जात कामगारांना मारहाण करत पैसे वसूल केले. या घटनेनंतर शहर पोलीस उपाधीक्षक विशाल ढुमे, तोफखान्याचे निरीक्षक सुनील गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. अक्षय जाधव यांचे बालिकाश्रम रोडवर रुबाब परफेक्ट मेनशॉप नावाचे कापड दुकान आहे. हे दुकान अक्षय जाधव व त्यांचा भाऊ सनी हे दोघे चालवितात. त्यांच्याकडे प्रेम विठ्ठल नन्नवरे व मुकुंद अर्जुन कांबळे असे दोघे कामगार आहेत. शनिवारी सायंकाळी पठारे बंधूनसह त्यांचे इतर साथीदार विना नंबरच्या चारचाकी वाहनातून जाधव यांच्या दुकानासमोर आले.
त्यांनी हातामध्ये लाकडी दांडके घेऊन दुकानात प्रवेश केला.यावेळी दुकानातील ग्राहक भीतीने निघून गेले. तू काउंटर मधील पैसे दे, आम्ही येथील डॉन आहोत. तुम्ही आम्हाला कपडे फुकट द्यायचे, आम्हाला हाप्ता द्यायचा असे म्हणत विजय पठारे याने दुकानातील सामान अस्ताव्यस्त केले. कामगार नन्नवरे यांच्याकडून पैसे व मोबाईल घेऊन विजय पठारे साथीदारांसह निघून गेला. त्यानंतर निलक्रांती चौकातील प्रवीण ठकसेन साळवे (रा.निलक्रांती चौक, नगर) याच्या सुनील सायकल मार्ट या दुकानात जात काउंटर मधील पाच हजार रुपये काढून घेतले. यासह विजय पठारे याने हातातील लाकडी दांडक्याने प्रवीण यांच्या मोबाईलवर मारून त्यांचा मोबाईल फोडून टाकला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here