सर सय्यद अहमदखान यांनी शिक्षण व्यवस्थेला आधुनिकतेची जोड दिली ः आबीद दुलेखान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 31, 2021

सर सय्यद अहमदखान यांनी शिक्षण व्यवस्थेला आधुनिकतेची जोड दिली ः आबीद दुलेखान

 सर सय्यद अहमदखान यांनी शिक्षण व्यवस्थेला आधुनिकतेची जोड दिली ः आबीद दुलेखान

मखदुम सोसायटीच्यावतीने स्वा.सै. सर सय्यद अहेमद खान यांना अभिवादन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः पारंपारिक मदरसा प्रणित शिक्षण व्यवस्था आणि ब्रिटीशांच्या आगमनानंतर भारतात आलेली चर्चप्रणित शिक्षण व्यवस्था यातील संघर्षात पारंपारिक मदरसाप्रणित शिक्षण व्यवस्थेला आधुनिक शिक्षणाची जोड देण्याचे महत्वपूर्ण कार्य सर सय्यद अहमदखान यांनी पार पाडले. म्हणूनच डॉ.राजेंद्रप्रसाद आणि डॉ.जाकीर हुसेन सारखे राष्ट्रपती याच मदरसा शिक्षण व्यवस्थेतून निर्माण होऊ शकले. त्यांच्यामुळे केवळ मुस्लिम समाजाचं नव्हे तर संपूर्ण भारतीय समाजच इंग्रजी भाषेतून शिक्षण घेऊ लागला. त्यांनी मध्ययुगीन भारतातील चाळीसपेक्षा जास्त अरबी, फारशी ग्रंथांची इंग्रजीत भाषांतरे केली हे त्यांचे सर्वात मोठे कार्य आहे, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे सचिव आबीद दुलेखान यांनी केले.
मखदुम सोसायटी व अहमदनगर जिल्हा उर्दु साहित्य परिषदेच्या वतीने स्वातंत्र्य सेनानी सर सय्यद अहेमद खान यांच्या पुण्यतिथि निमित तयांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे अध्यक्ष आबीद दुलेखान, सहसचिव डॉ. कमर सुरुर, सदस्य नफीसा हया,कवी सलीम खान यावर, तौसिफ खान, बिलाल खान आदि उपस्थित होते.
प्रास्तविक करतांना सलीम खान यावर यांनी सांगितले की, आज आपण स्वत:चे वाढदिवस थाटामाटात साजरे करत असतो; पण ज्यामुळे स्वातंत्र्य उपभोगत आहोत, त्यांचा जन्मदिवस व पुण्यतिथि साजरी करण्यात फार उदासिनता जाणवते, ही समाजाचे दुर्भग्य आहे, असे नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सना खान यांनी केले, तर आभार नेहा खान यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here