जागतिक विद्यापीठ निवड चाचणी स्पर्धेत कु.गणेश जितेंद्र लांडगे याने रौप्यपदक पटकावले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 24, 2021

जागतिक विद्यापीठ निवड चाचणी स्पर्धेत कु.गणेश जितेंद्र लांडगे याने रौप्यपदक पटकावले

 जागतिक विद्यापीठ निवड चाचणी स्पर्धेत कु.गणेश जितेंद्र लांडगे याने रौप्यपदक पटकावले


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः ऑगस्ट 2021 मध्ये चेंगदू चायना येथे होणार्या जागतिक विद्यापीठ 2021 स्पर्धेसाठी अखिल भारतीय विद्यापीठाचा ज्युदो संघ निवडी साठी दि. 11 ते 15 मार्च दरम्यान राजर्षी शाहू महाराज विश्वविद्यालय कानपुर उत्तरप्रदेश येथे निवड चाचणी घेण्यात आली. या निवड चाचणी मध्ये संपूर्ण भारतामधील प्रत्येक वजन गटातील उत्कृष्ठ खेळाडूंना बोलवण्यात आले होते. त्यामध्ये नगरच्या दोन खेळाडूंची निवड करण्यात आली होती. सिद्धीबाग ज्युदो हॉलच्या कु. आदित्य संजय  धोपावकर (न्यू लॉ कॉलेज) व कु. गणेश जितेंद्र लांडगे (चंद्रशेखर आगाशे कॉलेज ऑफ फिजीकल एज्युकेशन पुणे ) यांची निवड झाली होती. कानपुर येथे झालेल्या निवड स्पर्धेत प्रत्येक वजन गटातील दोन खेळाडूंना निवडण्यात आले. यामध्ये 100 किलो खालील वजन गटात कु. गणेश लांडगे यास सुवर्णपदकाने थोडक्यात हुलकावणी दिली थोड्या गुणांच्या फरकाने त्याने तेथे रौप्य पदक पटकावले.
विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंचे जागतिक विद्यापीठ स्पर्धेपूर्वी प्रशिक्षण शिबिर घेण्यात येऊन त्या मधुन भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे संभाव्य जागतिक विद्यापिठ स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात सिद्धीबाग हॉलच्या कु.गणेश लांगडे यांची निवड झाली आहे. भारतीय संघाच्या शिबिरात गणेश लांडगे यानी प्रथम क्रमांक मिळवल्यास  भारतीय संघात निवड होईल त्यासाठी तो कसून सराव करत आहे.  यासाठी त्याला राष्ट्रीय कीर्तीचे मार्गदर्शक प्रा. संजय धोपावकर यांचे मार्गदर्शन लाभले. व खा.डॉ.सुजय विखे पा.,यंग मेन्स ज्युदो असो. चे अध्यक्ष अ‍ॅड धंनजय जाधव,  पै.वैभव लांडगे, पै.शुभम दातरंगे, आगाशे महाविद्यालयाचे प्राचार्य सोपान कांगणे आणि सर्व स्टाफने अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment