कोरोना व महागाईच्या चक्रव्यूहात हॉटेल व्यवसाय! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 24, 2021

कोरोना व महागाईच्या चक्रव्यूहात हॉटेल व्यवसाय!

 कोरोना व महागाईच्या चक्रव्यूहात हॉटेल व्यवसाय!

गॅस सिलेंडर, खाद्यतेल, भाजीपाला, आटा, कोळसा सारंच महाग.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः झणझणतील मिसळ.. वडापाव.. मसाला डोसा.. राईस प्लेट.. चिकन मसाला प्लेट.. मटन प्लेट.. तंदुरी रोटी.. पुलाव.. मसाला राईस..या नगरकरांच्या आवडीच्या डिशेस. म्हणूनच नगरमध्ये हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला, शहरातील हॉटेल व्यवसाय पाठोपाठ प्रमुख महामार्गावरील ढाबे, खानावळी, नाष्टा सेंटर टपर्‍यांनी नगरकरांच्या जिभेचे चोचले पुरविले पण मार्च 2020 पासून कोरोनाचा विळखा व आता उसळलेला महागाईच्या आगडोंब यामुळे हॉटेल व्यावसायिक चिंताकांत झाले आहेत. कोरोनाकाळात सहा महिन्यांहून अधिक काळ टाळेबंदी लागलेला हॉटेल व्यवसाय पुन्हा रुळावर येण्याच्या आत चक्रव्यूहात सापडला आहे. गॅस सिलिंडर, खाद्यतेल, भाजीपाला, आटा, कोळसा सारेच महाग झाले आहे. त्यात कामरागांची पगारवाढ, ग्राहकांची रोडावलेली संख्या यामुळे सारे गणित बिघडले आहे. या स्थितीत दरवाढीशिवाय पर्याय उरलेला नाही. यामुळे हॉटेलिंग महागणार असून, ग्राहकाच्या खिशाला कात्री लागणार आहे. सतत वाढणारे असमान दर कारणीभूत असल्याने हॉटेलिंग व्यवसाय अडचणीत येत असल्याचे हॉटेल मालकांच्या लक्षात आले आहे.

प्रामाणिकपणे हॉटेल व्यवसाय करणार्‍यांच्या डोक्यावर कराचा बोजा आहे. त्यांना वेळेचे बंधन आहे. जे गल्लीबोळात खानावळी, नाश्ता सेंटर उघडून बसले आहेत, त्यांना कसलाही कर नाही. तेथे दर कमी ठेवून व्यवसाय सुरू आहे, अशा स्पर्धेला कसे सामोरे जायचे, हा प्रश्न हॉटेल व्यावसायिकांपुढे आहे. कोरोनाचं संकट असताना ’दुष्काळात तेरावा महिना’ म्हणजे सध्या गॅस सिलिंडर, तेल, मसाल्याचे पदार्थ महागले आहेत. त्यात भर म्हणजे सर्वाधिक पसंतीला असणारी तंदूर रोटी आता महागणार आहे. कारण आट्याचे दर दीड हजार रुपये पोत्यावरून दोन हजार ते दोन हजार 200 रुपयांपर्यंत वाढले आहेत. भट्टीचा कोळसा महागला आहे. कांदा दर सध्या मर्यादित असले तरी त्याचा कधी भडका उडेल याचा नेम नाही. खाद्यतेलाच्या दरात 40 टक्के वाढझाली आहे. या गोष्टींचा विचार करून हॉटेल व्यावसायिक दरवाढीच्या विचारात आहेत. दरवाढ केली, तर ग्राहक पाठ फिरवतील, याचीही चिंता व्यावसायिकांना आहे. व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरची किंमत एक हजार 600 रुपयांवर पोचली आहे. ही वाढ डोकेदुखी ठरत आहे. खाद्यतेलाच्या दरात सरासरी 40 टक्के वाढ झाली आहे. सूर्यफूल तेल 160 रुपये, तर मटणाचे दर 600 रुपये, तर चिकनचे दर 200 रुपये प्रतिकिलोवर पोचले आहेत. गॅस सिलिंडर आणि खाद्यतेल हॉटेल निश्चितीचा पाया ठरतो. त्यातच प्रचंड वाढ झाल्याने हा व्यवसाय संकटात सापडला आहे. दरवाढ करावी तर आधीच ग्राहकांची संख्या रोडावली आहे. दर तसेच ठेवावे तर गणित बसत नाही. अशा कात्रीत हॉटल व्यावसायिक आहेत.

No comments:

Post a Comment