भाजपाचा खोटेपणा लवकरच, उघडकीस येईल - रोहित पवार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 24, 2021

भाजपाचा खोटेपणा लवकरच, उघडकीस येईल - रोहित पवार.

 भाजपाचा खोटेपणा लवकरच, उघडकीस येईल - रोहित पवार.


जामखेड -
भाजपला हे सरकार अडचणीत आणायचे आहे. त्यासाठीच त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, यात एक ठळक गोष्ट अशी की भाजपला वाटते की राजकारण त्यांनाच कळतं. त्यामुळे प्रत्येकवेळी ते राजकारणच खेळत जातात. मात्र, जेव्हा सत्य पुढे येते, तेव्हा ते उघडे पडतात. अभिनेता सुशांतसिंग मृत्यूच्यावेळीही असेच झाले होते. आपण जे सत्य सांगत होतो,त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी बिहारमधील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्याचे राजकारण केले. तेव्हा पोलिसांच्या विरोधातही त्यांनी भाष्य केले. शेवटी सत्य लोकांच्या पुढे आले.
रोहित पवार जामखेड येथे प्रसार माध्यामांशी बोलत होते. ते म्हणाले की, एखादा वरिष्ठ अधिकारी जेव्हा आरोप करतो तेव्हा त्याकडे लक्ष देण्याची गरज असते. त्यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. हाच अधिकारी जेव्हा पदावर असतो, तेव्हा एक शब्दही बोलत नाही आणि पदावरून दूर केल्यावर का बोलत आहे? अधिकार्‍यांवर जर काही राजकीय लोकांचा प्रभाव असेल तर ते माझ्यासारख्याला चुकीचे वाटते. अशीच गोष्ट सध्याच्या या प्रकरणात घडत आहे.
आता भाजपा जे करत आहे. त्यातील सत्य लवकरच बाहेर येईल व भाजपाचा खोटेपणा उघडकीस येईल असा दावा आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. लोकांना हे माहिती आहे. त्यामुळे जेवढे भाजपवाले राजकारण करतील तेवढी त्यांच्या विरोधात लाट निर्माण होईल, असेही रोहित पवार म्हणाले. आर्थिक अडचणीत असून सुद्धा हे सरकार काम करीत आहे, हे लोक पहात आहेत. त्यामुळे घटक पक्षही अधिक जवळ येत आहेत. हे सरकार पाच वर्षे टिकेल आणि पुढील वेळी पुन्हा निवडून येईल, असा विश्वासही रोहित यांनी व्यक्त केला. सध्या भाजपचे लोक प्रत्येक मुद्द्यावर  राजकारण खेळत आहेत. त्यांना वाटते फक्त त्यांनाच राजकारण कळते. मात्र, लोकांनाही हे कळून चुकले आहे. त्यामुळे ते जेवढे राजकारण करतील तेवढी त्यांच्याविरुद्ध लोकांच्या मनात लाट येईल, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार  यांनी लगावला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here