कोरोना लस सरसकट व बंधनकारक करा! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 29, 2021

कोरोना लस सरसकट व बंधनकारक करा!

 कोरोना लस सरसकट व बंधनकारक करा!

पालकमंत्री हसन मुश्रिफ यांची केंद्र शासनाकडे मागणी


अहमदनगर ः लॉक डाउन बाबत राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही पण नगर जिल्ह्यात राज्य शासनाच्या सूचनेनुसार कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना रोखायचा असेल तर केंद्र सरकारने लसीकरणाच्या वयाची अट काढून सरसकट लसीकरण बंधनकारक करावे अशी मागणी आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.  जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक झाल्यानंतर ते बोलत होते. यावेळी आमदार निलेश लंके, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी  संदीप निचित आदी यावेळी उपस्थित होते

वाझे प्रकरणामुळे महाविकास आघाडी अडचणीत येणार नाही, एटीएस या संदर्भामध्ये तपास करत असताना तो  ऐन वेळेला एन आय ए कडे देण्यात का आला, परमवीर सिंग यांच्याकडे संशयाची सुई येत असल्याने सिंगांना माफीचा साक्षीदार करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न भाजपने  करायला सुरुवात केली आहे, असा आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला.
वाझे प्रकरणामुळे महाविकासआघाडी मध्ये कोणतीही अडचण येणार नाही. अंबानींच्या घरासमोर शस्त्रसाठा का ठेवला, याचा मास्टरमाईंड कोण आहे, मनसुख हिरन यांची हत्या कशामुळे झाली याचा उलगडा व्हायला पाहिजे, असे आमचे म्हणणे आहे. वाझे प्रकरणाचा तपास करत असताना एटीएस ते शेवटच्या टप्प्यापर्यंत आली होती.  मात्र ऐन वेळेला हा तपास एन आय ए कडे देण्यात आला, असा दावा करून मुश्रीफ म्हणाले,  परमवीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर आरोप केले, पण अनेक प्रकरणांमध्ये परमविर सिंह यांनी कारवाई केली, अर्णव गोस्वामी व टी आर पी संदर्भात सुद्धा त्यांनी तात्काळ कारवाई केली, त्यामुळेच ते भाजपाच्या रडारवर होते. वाझे प्रकरणाची संशयाची सुई सुद्धा त्यांच्याकडे जाते की काय अशी शक्यता निर्माण झाल्यामुळे आता परमविर सिंग यांनाच वाचविण्याचा प्रकार भाजपकडून केला जात आहे पण हा विषय गंभीर असून सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
रश्मी शुक्ला यांच्यासारख्या अधिकार्‍यांनी भाजपच्या खाल्ल्या मिठाला जगण्याऐवजी शासनाच्या खाल्ल्या मिठाला जागले पाहिजे, असे सांगून मुश्रीफ म्हणाले,  24 ऑक्टोबर 2019 ते 24 नोव्हेंबर 2019 या महिन्याभराच्या कालावधीमध्ये महा विकास आघाडीच सत्ता स्थापन होत असताना रश्मी शुक्ला यांनी
मंत्री यद्रावकर हे अपक्ष होते, त्या अपक्ष आमदारांना फोडण्यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपयांचा ऑफर पाटील नामक या व्यक्तीकडून दिल्या गेल्या. त्यामुळे या महिनाभराचा शुक्ला यांचा सीडीआर जप्त करावा व या प्रकाराची चौकशी करावी, असेही ते म्हणाले, एका पोलिस अधिकार्‍याला अशा प्रकारचे फोन टापिंग करणे हे शोभा देत नाही हा एक प्रकारे वर्दीचा अपमान आहे त्यामुळे या प्रकरणात जे काय सत्य आहे, ते जनतेसमोर आले पाहिजे असे ते म्हणाले. जिल्ह्यात रेमडेसीवीरचा साठा कमी असून हा साठा मिळण्याबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरु आहे. नागरिकांनी, लोकप्रतिनिधींनी मास्क वापर, गर्दी टाळणे या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी करोना प्रतिबंध उपाययोजनांबाबत सांगितले की, दहावी व बारावी वगळता सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत गर्दी टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट रात्री आठनंतर पूर्ण बंद राहणार आहे. कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेवून पुढील 100 दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here