कांद्याच्या बिलावरून हत्या.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 5, 2021

कांद्याच्या बिलावरून हत्या..

 कांद्याच्या बिलावरून हत्या..  आरोपीस जन्मठेप व दंड


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जुलै 2017 मध्ये कांद्याच्या बिलावरून झालेल्या वादातून केशव दशरथ झराड यांची हत्या करणारे पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी येथील आरोपी अरुण हरिभाऊ तुपे यांना न्यायालयाने जन्मठेप व 20 हजार रुपयांची दंडाची शिक्षा सुनावली आहे.
आरोपीच्या बनावामुळे आणि गैरसमजातून अडकलेले संजय पेंटर उर्फ संजय पेत्रस भिंगारदिवे यांची पूर्वीच सुटका झाली असून त्यांचीच साक्ष महत्वाची ठरली. ही घटना संजय पेंटर उर्फ संजय पेत्रस भिंगारदिवे यांनी पाहिली. ते भांडण सोडविण्यासाठी गेले. तेव्हा आरोपी तुपे यांनी त्यांनाही दगड फेकून मारला. भिंगारदिवे यांनी तो दगड हुकविला आणि घाबरून तेथून पळून गेले. त्यांनी ही घटना पाहिल्याचे लक्षात आल्याने आरोपी तुपे त्यांचा पाठलाग करीत त्यांच्या घरी गेला.
घरात घुसून आरोपीने भिंगारदिवे यांच्यावर चाकूने वार केले. त्यात भिंगारदिवे जखमी झाले. त्यानंतर आरोपी तुपे पुन्हा तळ्याजवळ गेला. त्याच चाकूने त्याने जर्‍हाड यांच्यावरही वार केले. गंभीर जखमी झालेले जर्‍हाड यांचा मृत्यू झाला. मात्र, आरोपी तुपे याने चलाखी केली.
त्याने जर्‍हाड यांचे नातेवाइक प्रमोद जर्‍हाड यांना फोन करून सांगितले की, ’संजय पेंटरने केशव तात्याला खारोळ्याच्या तळ्याजवळ चाकून मारले आहे.’ त्यावर जर्‍हाड यांनी विश्वास ठेवला. त्यामुळे पोलिसांकडे त्यांनी तशीच फिर्याद दिली. पोलिसांना सुरुवातीला भिंगारदिवे यांच्याविरूद्धच गुन्हा दाखल केला. मात्र, तपास करताना पोलिसांना संशय आला.
पोलिसांनी सर्व घटनाक्रम आणि संजयच्या जखमा, त्याने दिलेली माहिती यांची जुळवाजुळव केली असता संजय नव्हे तर तुपे हाच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संजय भिंगारदिवे यांना गुन्ह्यातून वगळण्यात आले आणि तुपे याला अटक करून त्याच्याविरूद्ध न्यायालयात दोषारोपत्र पाठविण्यात आले. पाथर्डी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक वाय. एस. राक्षे यांनी तपास पूर्ण केला. या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे यांच्यासमोर झाली. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील मंगेश दिवाणे आणि अनिल ढगे यांनी बाजू मांडली. सुनावणी दरम्यान सरकारपक्षाकडून आठ साक्षिदार सादर करण्यात आले. त्यामध्ये प्रत्यदर्शीसह मृत जर्‍हाड यांची पत्नी, वैद्यकीय अधिकारी, पोलिस यांच्या साक्ष नोंदवल्या.त्यांची साक्ष आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी तुपे याला दोषी ठरविले.

No comments:

Post a Comment