ब्रेकिंग- राज्यात रविवारी रात्रीपासून जमावबंदी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 26, 2021

ब्रेकिंग- राज्यात रविवारी रात्रीपासून जमावबंदी.

 ब्रेकिंग- राज्यात रविवारी रात्रीपासून जमावबंदी.नगरी दवंडी

अहमदनगर - सध्या राज्यात कोरोनाची लाट आली असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (28 मार्च) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

भारतात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. सर्वाधिक अॅक्टिव रुग्ण असलेल्या देशातील दहा जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे तर एकट्या महाराष्ट्रात आहेत.त्यात पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वाढती कोरोना प्रकरणं सरकारसाठीसुद्धा डोकेदुखी ठरली आहे.

मुख्यमंत्र्यांनी जिल्हा आणि विभागनिहाय आढावा घेतला. नागरिकांच्या बेजबाबदारपणाबाबतही सरकारने चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लवकरच कडक निर्बंध लावले जाणार आहेत. जिथं परिस्थिती अती गंभीर आहे, तिथं कर्फ्यू लावण्याचाही सरकारचा विचार आहे. उद्या दुपारपर्यंत राज्यातील कोरोनासंबंधी नवीन नियमावली जारी केली जाणार आहे.

 राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (दिनांक २८ मार्च २०२१) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक,जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, जिल्हा तसेच राज्य टास्क फोर्स चे सदस्य,वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याशी संवाद साधून कोविड स्थिती, करण्यात येत असलेल्या उपाययोजना जाणुन घेतल्या त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही परंतू वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्याप्रमाणात राज्यभर उभारणी केली त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होतांना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेडस व औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here