विकास प्रश्नांबाबत अ‍ॅड.पिल्ले यांचा व्यासंग मोठा होता- भुजबळ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 24, 2021

विकास प्रश्नांबाबत अ‍ॅड.पिल्ले यांचा व्यासंग मोठा होता- भुजबळ

 विकास प्रश्नांबाबत अ‍ॅड.पिल्ले यांचा व्यासंग मोठा होता- भुजबळ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर कॅन्टोमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष तथा भिंगार काँग्रेसचे शहराध्यक्ष अ‍ॅड.रामकृष्ण रत्नम् पिल्ले यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन नगर शहर काँग्रेसच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहर काँग्रेसचे नेेते बाळासाहेब भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली तांगेगल्ली येथील कार्यालयात ही श्रद्धांजली सभा झाली.
नगर आणि भिंगार काँग्रेसला एकत्र जोडण्याचे काम स्व.पिल्ले यांनी केले. काँग्रेस पक्षात अखेरपर्यंत ते कार्यरत होते. भिंगारच्या अनेक प्रश्न त्यांनी सोडविले. भिंगारच्या प्रश्नांबाबत त्यांचा व्यासंग मोठा होता, असे श्री.भुजबळ यांनी सांगितले. याप्रसंगी ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते अनिल परदेशी, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज शफी खान, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस उबेद शेख, प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर, डि.जी.भांबळ, माजी नगरसेवक रुपसिंग कदम, निजाम पठाण, सौ.किरण आळकुटे, रजनी ताठे, एम.आय.शेख, राजेश बाठिया, अ‍ॅड.नरेंद्र भिंगारदिवे आदिंनी स्व.पिल्ले यांच्या कार्याचा गौरव करुन जुन्या आठवणींना उजाळा दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here