महिलांकडून दाखवला जाणारा विश्वास ही पतसंस्थेची मोठी उपलब्धी : बोरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 15, 2021

महिलांकडून दाखवला जाणारा विश्वास ही पतसंस्थेची मोठी उपलब्धी : बोरा

 महिलांकडून दाखवला जाणारा विश्वास ही पतसंस्थेची मोठी उपलब्धी : बोरा

नगर : देशाच्या जडणघडणीत महिला शक्तीचा मोठा वाटा आहे. आज जवळपास सर्वच क्षेत्रात महिलांनी स्वत:ला सिध्द करून दाखवले आहे. भारतीय संस्कृतीत तर महिलेला देवीच्या रुपात पाहिले जाते. अशा या नारीशक्तीप्रती सन्मान व्यक्त करणे, तिचा आदर करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल नागरी सहकारी पतसंस्थेच्या वाटचालीत महिला संचालक तसेच महिला कर्मचार्यांचे मोलाचे योगदान आहे. संस्थेत महिला उत्स्फूर्तपणे येवून ठेवी ठेवतात, हा विश्वास आमच्यासाठी मोलाचा आहे. त्यामुळे महिलांसाठी नेहमीच चांगल्या योजना आणण्याचा प्रयत्न असतोे, असे प्रतिपादन सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ईश्वर बोरा यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेच्यावतीने महिला ठेवीदार लता गुगळे यांचा तसेच पतसंस्थेच्या सहव्यवस्थापक नयना बोगावत, महिला कर्मचारी दीपिका जेटला, विद्या भंडारे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी व्हा.चेअरमन किरण शिंगी, संचालक मनोज गुंदेचा, शांतीलाल गुगळे, शैलेश गांधी, समीर बोरा, पंडीतराव खरपुडे, विनय भांड, सी.ए.विशाल गांधी, सी.ए.संकेत पोखरणा, व्यवस्थापक प्रशांत भंडारी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here