रुग्णांना जीवनदान देण्याचे पुण्य कर्म : डॉ. बोरगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 5, 2021

रुग्णांना जीवनदान देण्याचे पुण्य कर्म : डॉ. बोरगे

 रुग्णांना जीवनदान देण्याचे पुण्य कर्म : डॉ. बोरगे

आनंदऋषीजी हॉस्पिटल टीमकडून...
आज करोना लसीकरणाचा शुभारंभ.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आचार्यश्री आनंदऋषीजींच्या आशीर्वादाने कार्यरत असलेल्या हॉस्पिटलमधील रुग्णसेवेचे कार्य अतिशय वाखाणण्याजोगे सुरु आहे.    कोविड 19 च्या   गंभीर  परिस्थितीमध्ये अनेक रुग्णांना जीवनदान देण्याचे पुण्यकर्माचे कार्य केले आहे.  यासाठी हॉस्पिटल अभिनंदनास पात्र आहे. आता कोविड लसीकरणातही हॉस्पिटल नावलौकिकाप्रमाणे काम करेल हा विश्वास आहे. हॉस्पिटलच्या कार्यास  महानगरपालिकेच्यावतीने  सर्वतोपरी सहकार्य  राहील.  अशी ग्वाही महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली.
शासनाच्या आदेशानुसार आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या लसीकरणाचा प्रारंभ आज करण्यात आला. यावेळी डॉ. बोरगे बोलत होते. श्री बोरगे पुढे म्हणाले की, कोविड काळात सर्वच आरोग्य यंत्रणांची मोठी कसोटी लागली. यात आनंदऋषीजी हॉस्पिटलनेही नगरमध्ये योद्ध्याप्रमाणे रूग्णांना सेवा दिली. महामारी असतानाही हॉस्पिटलने सेवाभाव कायम ठेवत मनपाच्या विविध प्रयत्नांना अतिशय उत्तम साथ दिली.
डॉ प्रकाश कांकरिया यांनी उपस्थितांचे स्वागत करताना सांगितले की, लस घेण्यासाठी येताना संबंधितांनी आधार कार्ड बरोबर आणावे. यासाठी र्लेींळव.र्सेीं.ळप या वेबसाईटवर नोंदणी करावी. नोंदणी करताना अडचण आल्यास सदर सुविधा हॉस्पिटलमध्येही उपलब्ध करून देण्यात आली आहे. लसीकरणानंतर अर्धा तास संबंधित व्यक्तीला डॉक्टरांच्या देखरेखीसाठी  थांबावे लागेल. तसेच शासनाच्या नियमानुसारच दर आकारणी होईल. लस संपूर्ण सुरक्षित असून 45 ते 59 या वयोगटातील व्याधीग्रस्त व 60 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस मिळणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
हॉस्पिटलच्या उभारणीपासून सातत्याने योगदान देणारे उद्योजक प्रकाशजी मुनोत, सौ. छायाताई मुनोत यांना लसीकरणाचा  पहिला डोस देण्यात आला. याप्रसंगी डॉ .प्रकाश कांकरिया, प्रकाश छल्लाणी, प्रशासकीय अधिकारी डॉ.आशिष भंडारी, डॉ.वैभवी  वंजारे, डॉ. विवेक जाधव व लसीकरणासाठी नागरिक उपस्थित होते. प्रकाश छल्लाणी यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here