मुजाहीद कुरेशीच्या हस्ते हातमपुरा भागामध्ये काँक्रेटीकरण कामाचा शुभारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 8, 2021

मुजाहीद कुरेशीच्या हस्ते हातमपुरा भागामध्ये काँक्रेटीकरण कामाचा शुभारंभ

 मुजाहीद कुरेशीच्या हस्ते हातमपुरा भागामध्ये काँक्रेटीकरण कामाचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः प्रभाग क्रमांक 11 मध्ये हातामपुरा चौक भागामध्ये रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ मुजाहीद कुरेशी यांच्या हस्ते संपन्न झाला आहे. नगर शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ मुजाहीद कुरेशी यांच्या हस्ते आज करण्यात आला तर याप्रसंगी स्थायी समिती सभापती अविनाश घुले, नगरसेवक नज्जू पैलवान,  मुजाहीद कुरेशी, सुनील मोरे, निसार भाईमिया, वसीम शेख, साले चाऊस, मोहन मोरे, विजय रायमोकर, विशाल रायमोकर, अमृत खाबिया, गुड्डू खान,रमीज खान, रेहान कुरेशी, मोसद्देक मेमन, फरीद कुरेशी, तसेच प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
मुजाहीद कुरेशी यांनी यावेळी बोलताना म्हंटले की, प्रभाग 11 मधील कामांना गती देण्यासाठी आपण वारंवार पाठपुरवा केला असून आमदार संग्राम जगताप,  यांच्याकडे मागणी करुन निधी मंजुर करुन घेतला असुन या प्रभागाचा लवकरच कायापालट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येथील प्रभाग क्रमांक 11 मध्ये विविध विकास कामाला आता गती देण्यात येणार असून, अमृत योजनेअंतर्गत पाण्याची पाईपलाईन तसेच भुयारी गटार योजना आदींचे काम पुर्णत्वाकडे आहेत. भविष्यामध्ये प्रभाग क्रमांक 11 मॉडेल प्रभाग म्हणून ओळखला जाईल यासाठी काम करणार शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडे पाठपुरावा करून आमदार निधीतून भरगोस असा निधी या प्रभागाच्या कामासाठी उपलब्ध करणार असे प्रतिपादन मुजाहीद कुरेशी यांनी उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment